ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी. हेमंत ऋतू. उत्तरायण. शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज सकाळी १०.०० नंतर चांगला दिवस आहे” *संकष्टी चतुर्थी* चंद्रोदय मुंबई – रात्री ९.०१, नाशिक – रात्रौ ९.०३. कोल्हापूर – रात्रौ ९.०७.
नक्षत्र: अश्लेषा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी- कर्क.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अचानक एखादा खर्च उदभवू शकतो. चुकीचे निर्णय घेतले जातील. बुद्धिभेद टाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) व्यव स्थानी हर्षल आहे. संकटाची नांदी आहे. मान अपमान बाजूला ठेवा. नात्यात वाद विवाद नकोत.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) हरवलेले सापडले अशी अवस्था होईल. रखडलेली खरेदी आज पूर्ण कराल. पैसे हाताळताना काळजी घ्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मेजवानीचे योग आहेत. सहलीचे बेत आखाल मात्र आधी नोकरीच्या ठिकाणी खात्री करून घ्या. नियोजन बदलू शकते.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रतिकूल दिवस आहे. पाप पुण्याचा विचार करावा लागेल. पर्यटन करताना काळजी घ्या. त्रास संभवतो.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. लाभतील चंद्र तुमचा उत्साह वाढवेन. मात्र अति पैशांचा हव्यास टाळा. विंचू – काट्याचे भय आहे.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नोकरीच्या ठिकाणी वैयक्तिक संबंध आणू नका. अधिकाराचा गैरवापर टाळा. प्रेमात फसवणूक होऊ शकते.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नेतृत्व गुण चमकतील. स्तुती होईल मात्र प्रवासात त्रास होऊ शकतो. वाहन जपून चालवा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल ग्रहमान आहे. पंचमात हर्षल आहे. अष्टमस्थानी चंद्र आहे. विश्रांती घेणे उत्तम. मोठी जोखीम नको.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) साधी राहणी आवश्यक आहे. मत्सर त्रास जाणवेल. मातेची चिंता वाटेल. हृदयाची काळजी घ्या.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मानसिक अस्वस्थता जाणवेल. ज्ञानधारणा आणि ध्यान धारणा आवश्यक आहे. चांगले कर्म करा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) राजनीती टाळा. काळजी घ्या. भोजनातून त्रासदायक ग्रहण केले जाऊ शकते. विचारपूर्वक निर्णय घ्या.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
