आजचे राशिभविष्य शनिवार,६ जानेवारी २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक 
मार्गशीर्ष कृष्ण दशमी. हेमंत ऋतू,उत्तरायण.   
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज दुपारी १२.०० पर्यत चांगला दिवस आहे” घबाड रात्री ९.२३ पर्यंत.   
नक्षत्र: स्वाती. आज जन्मलेल्या बाळाची राशी- तुळ. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) रवी चंद्र शुभ योगाचा लाभ मिळेल. सहकारी मदत करतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. अचानक खर्च  वाढेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होतील. सुखद घटना घडतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) पंचमातील चंद्र तुमच्याकडून उत्तम कामगिरी करून घेतील. शत्रू नाश होईल. नोकरीत कामाचा ताण वाढेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. मन प्रसन्न राहील. दिशा मिळेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक दृष्टीने लाभदायक दिवस आहे. धाडसी निर्णय घ्याल. नवीन संधी चालून येतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) कौटुंबिक खर्च वाढतील. पत्नीसाठी वेळ द्यावा लागेल. मिष्टान्न मिळतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) तुमच्याच राशीत चंद्र आहे. मन आनंदी राहील. नात्यातून लाभ होतील. भावनाड मदत करतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. फारसे आशादायक काम होणार नाही. अधिकारात वाढ होईल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम दिवस आहे. संधीचा लाभ घ्या. वेळ दवडू नका. तुमची कीर्ती दिगंत पसरेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) व्यवसायात वाढ होईल. वरिष्ठांची काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी काही खर्च देखील होऊ शकतो.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक दृष्ट्या चांगला दिवस आहे.लक्ष्मी प्रसन्न राहील. शब्दास मान मिळेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) फारसा अनुकूल दिवस नाही.काही काळ वाट बघावी लागेल.बोलण्यातून गैरसमज होऊ शकतात.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव”या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.