आजचे राशिभविष्य ,रविवार,२८ जानेवारी २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
पौष कृष्ण तृतीया. हेमंत ऋतू.शोभन नाम संवत्सर. 
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज संध्याकाळी ५.०० पर्यंत चांगला दिवस आहे” 
चंद्र नक्षत्र – मघा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -सिंह. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  आज अनेक शुभ योग आहेत. योग्य गुंतवणूक कराल. अचूक निर्णय घ्याल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) गृहसौख्य लाभेल. स्थावर संपत्तीचे प्रश्न सुटतील. धार्मिक कामासाठी खर्च कराल.

मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभ होतील. कामाचा वेग वाढेल. योग्य सल्ला मिळेल. धर्माचार्यांची भेट घडेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कौटुंबिक सौख्य लाभेल. वाचा सिद्धी प्राप्त होईल. आर्थिक चिंता मिटेल. वडिलोपार्जित संपत्तीत वाढ होईल.

सिंह:– (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तुमच्या राशीत चंद्र आहे. आरोग्यात सुधारणा होईल. मनाची स्थिरता वाढेल. पुण्याई कामास येईल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. कार्यकुशलता वाढेल. अधिक मेहनत करावी लागेल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. नवनवीन सुखद अनुभव येतील. प्रिय व्यक्तीची भेट होईल. चातुर्य पणास लागेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नोकरीत मनासारख्या घटना घडतील. सरकारी मान्यता मिळेल. वरिष्ठ खुश राहतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) भाग्योदय होईल. लक्ष्मीची कृपा राहील. भौतिक सुखाची रेलचेल राहील. खरेदी कराल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. स्त्री धनात वाढ होईल. संयमाने काम करा. गुप्त बाबींची वाच्यता करू नका.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  सप्तम स्थानी चंद्र आहे. नवीन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली जाईल. प्रतिस्पर्धी पराभूत होतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. आर्थिक बाजू भक्कम होणार आहे. उत्साह वाटेल. सांसर्गिक रोगांपासून दूर रहा.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.