आजचे राशिभविष्य रविवार,२ जून २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
वैशाख कृष्ण एकादशी. ग्रीष्म ऋतू.क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस आहे”  *अपरा (स्मार्त) एकादशी*
चंद्र नक्षत्र – रेवती. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  उपासना करा. दानधर्म करा. आज खर्च वाढतील. आत्मविश्वास कमी होऊ शकतो. आर्थिक नियोजन करा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल चंद्र आहे. मन उत्साही राहील. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. अडथळे दूर होतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आज अधिक काम करावे लागेल. नोकरीच्या या ठिकाणी चांगले अनुभव येतील. जेष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामानिमित्त बाहेर गावी जावे लागू शकते. मन प्रसन्न राहील तीर्थयात्रा घडेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. फारशी अनुकूलता नाही. घरातील जेष्ठ व्यक्तीची काळजी घ्या. संयम ठेवा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सप्तम स्थानी चंद्र आहे. बरेच दिवस वाट बघितली ती व्यावसायिक संधी आज चालून येईल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक लाभ होतील. नवीन संधी मिळतील. नोकरी इच्छुकांना चांगली बातमी येऊ शकते. मेहनत वाढवावी लागेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  पंचम चंद्र तुम्हाला प्रेरणा देईल. नवीन ज्ञान मिळेल. गूढ उलगडतील. नातेवाईक भेटतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)  राहत्या जागेजवळ भाग्योदय होईल. शेतीतून उत्पन्न मिळेल. नवीन ओळखी होतील. राजकीय यश प्राप्त होईल.

मकर:– (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) लाभदायक दिवस आहे. पराक्रम गाजवाल. भावंड भेटतील. नात्यातून लाभ होतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) धनप्राप्ती होईल मात्र खर्च देखील वाढेल. छोटी सहल घडेल. आर्थिक चिंता वाढेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आज तुमच्याच राशीत चंद्र आहे.आनंदाला उधाण येईल.अनुकूल घटना घडतील.मौज कराल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.