आजचे राशिभविष्य रविवार,३ मार्च २०२४  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
माघ कृष्ण सप्तमी/अष्टमी. शिशिर ऋतू.शोभन नाम संवत्सर.  
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज दुपारी ४.०० पर्यंत चांगला दिवस आहे” *भानू सप्तमी, काळाष्टमी* 
चंद्र नक्षत्र – अनुराधा/जेष्ठ. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अष्टम स्थानी चंद्र आहे. शनिशी केंद्र योग्य आहे. कायदे पालन करा. अपेक्षित यश मिळण्यास वेळ लागेल.

वृषभ:– (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामाचा तणाव वाढल्याने नियोजित घरगुती कार्यक्रम बदलतील. पत्नीशी मतभेद संभवतात.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक वृद्धी होईल. व्यवसाय वाढेल. मात्र दगदग वाढेल. दिरंगाई टाळा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. अति उत्साह टाळणे हिताचे आहे. एखादी अप्रिय घटना घडू शकते.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) घरगुती कामात गुरफटून जाल. नियोजन चुकेल. प्रलोभनांना बळी पडाल.

कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आनंदी दिवस आहे. योग्य सल्ला मिळेल. शौर्य दाखवाल. मात्र आरोग्याची काळजी घ्या.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कौटुंबिक सहलीचे नियोजन कराल मात्र प्रवासात अडथळे येतील. गुंतवणूक अडचणीत येऊ शकते.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तुमच्याच राशीत चंद्र आहे. स्थावर संबंधीत वाद निर्माण होतील. भाडेकरू त्रास देतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल दिवस आहे. विनाकारण वाद ओढवून घेऊ नका. लेखकांनी सावध राहावे. सुनेची चिंता वाटेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. काही चांगल्या घटना घडतील. कमी बोलणे हिताचे आहे.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  कामात व्यत्यय येईल. नियोजन बिघडेल. आध्यात्मिक लाभ मिळतील. ध्यान धारणा करा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मोठे खर्च वाढतील. अचानक एखादे संकट सामोरे येऊ शकते. सूर्य उपासना करा.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.