आजचे राशिभविष्य रविवार,२६ मे २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वैशाख कृष्ण चतुर्थी. ग्रीष्म ऋतू.क्रोधीनाम संवत्सर. 
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज संध्याकाळी ६.०० नंतर चांगला दिवस आहे” *संकष्टी चतुर्थी* चंद्रोदय – मुंबई रात्री १०.०२, नाशिक १०.००. पुणे ९.५६. 
चंद्र नक्षत्र – मूळ/पू षा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) बौद्धिक क्षेत्र गाजवाल. मार्ग सापडेल. प्रवास घडतील. धर्मश्रद्धा वाढेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) रविचा चंद्राशी अशुभ योग आहे. आत्मसन्मान ठेवणे आवश्यक आहे. विनाकारण अहंकार बाळगू नका. पित्याची काळजी घ्या.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल बुधाशी चंद्राचा शुभ योग आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल. उत्तम लाभ होतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामानिमित्त बाहेर गावी जावे लागू शकते. वक्तृत्व गाजेल. नवीन तंत्रज्ञानाचा वापर कराल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अचानक लाभ होतील. उपासना फळास येईल. छोटी सहल घडेल. धार्मिक कार्य घडेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अष्टम बुध चंद्र योग उत्तम धनलाभ देईन. अडथळे दूर होतील. नवीन संधी निर्माण होतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) फारशी अनुकूलता नाही. अडचणी वाढू शकतात. काळजीपूर्वक पावले टाका. जोडीदाराला विश्वासात घ्या.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  अनुकूल दिवस आहे. अधिकाराचा लाभ मिळेल. सन्मान होईल. मार्ग सापडेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)  सौख्य प्रदान करणारा दिवस आहे. मन आनंदी राहील. अनुकूल रवी विजयश्री खेचून आणेल. आरोग्य सांभाळा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. अपेक्षाभंगाचे दुःख पदरात येऊ शकते. राजकीय क्षेत्रात अपमानाचे प्रसंग येऊ शकतात.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल चंद्र वाटचाल सुकर करेन. काही सुखद अनुभव येतील. मात्र व्यवसायात तीव्र स्पर्धा जाणवेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)  सुखकारक दिवस आहे. आर्थिक आवक उत्तम होणार आहे. मन उत्साही राहील. येणी वसूल होतील.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव,भाग्योदय,आजार,तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.