आजचे राशिभविष्य रविवार,१ सप्टेंबर २०२४  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
श्रावण कृष्ण चतुर्दशी. क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००”

आज वर्ज्य दिवस आहे” *शिवरात्री* 
चंद्र नक्षत्र – अश्लेषा/मघा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -कर्क/सिंह.(विष्टी करण शांती करून घ्यावी)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  चंद्राचा मंगळ आणि गुरूशी शुभ योग आहे. वक्तृव चमकेल. दिलेला शब्द पाळला जाईल. पाळीव पशूंचा लाभ होईल. गृहसौख्य लाभेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) दबदबा वाढेल. अधिकारात बदल होतील. आर्थिक लाभ होतील. व्यवसायात भरभराट होईल. येणी वसूल होतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कौटुंबिक कार्यात सहभागी व्हाल. दानधर्म कराल. दुर्बल लोकांना मदत कराल. कठोर वागणे होईल. आत्मविश्वास कमी होऊ शकतो.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) तुमच्याच राशीत चंद्र आहे. अत्यंत अनुकूल दिवस आहे. अडचणी दूर होतील. स्वप्ने पूर्ण होतील. दिवस सत्कारणी लावा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे)  संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. आध्यात्मिक लाभ होतील. अधिक मेहनत करावी लागेल. मात्र त्याचे उत्तम फळ मिळेल. लवकरच अडचणी दूर होतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)  अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. मनासारखी कामे होतील. आर्थिक लाभ होतील. कुटुंबासोबत मौज कराल. लक्ष्मीची कृपा राहील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  आर्थिक लाभ होतील. नोकरीत नवीन संधी मिळतील. त्याचे सोने करा. कामानिमित्त प्रवास घडतील. सुसंवाद वाढेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. स्पर्धेत यश मिळेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. गूढ उलगडतील. शत्रू पराभूत होतील. यश मिळेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)  संमिश्र दिवस आहे. स्वजनाचा विरोध मावळला जाईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी घ्या. दानधर्म करण्यास उत्तम दिवस आहे.  धार्मिक कार्य कराल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. सप्तम स्थानी चंद्र – बुध युती आहे. जुने वाद मिटतील. संयमाची भूमिका घ्या. संतती कडून चांगली बातमी समजेल. प्रवास घडतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  आर्थिक लाभ होतील. शेतीतून उत्तम लाभ होतील. व्यवसाय वाढेल. कीर्ती प्राप्त होईल. मातृसेवा कराल. नैतिकता बळ देईन.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकुल ग्रहमान आहे. मंगळाचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. स्पर्धेत यश मिळेल. एखाद्या बाबतीत मनस्ताप सहन करावा लागू शकतो. छोटे प्रवास घडतील.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!