आजचे राशिभविष्य,गुरूवार,८ फेब्रुवारी २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
पौष कृष्ण त्रयोदशी/चतुर्दशी.हेमंत ऋतू.शोभन नाम संवत्सर. 
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज त्रयोदशी वर्ज्य दिवस आहे” *शिवरात्री*
चंद्र नक्षत्र – उत्तरा आषाढा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु/मकर.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दशम स्थानी चंद्र मंगळ आणि चंद्र बुध युती आहे. दुपारनंतर कामाचा वेग वाढेल. भ्रमंती घडेल. अधिकार वाढतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) दूरच्या प्रवासाचे योग् आहेत. रसायन आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना प्रगती कारक काळ आहे.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. प्रलोभने समोर येतील. प्रवासात काळजी घ्या. वाहन जपून चालवा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कोर्ट कामात यश मिळेल. शत्रूचा पराभव होईल. स्पर्धेत यश मिळेल. पश्चिम दिशेला प्रयाण होईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. आरोग्यात सुधारणा होईल. वैद्यकीय सेवा घ्यावी लागेल. नोकरीसाठी प्रयत्नांना यश मिळेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) नेहमीची विनयशीलता सोडून स्पष्टवक्तेपणाची भूमिका घ्याल. शेअर्स मध्ये उत्तम लाभ होतील. सहल घडेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  उत्तम औषधींचा लाभ होईल. सुवासिक द्रव्य वापरावे. जमीन जुमला यात फायदा होईल. पाळीव प्राण्यांचा लाभ होईल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) राशी स्वामी मंगळशी चंद्राची युती आहे. पराक्रम गाजवाल. लहान भावंडांची साथ लाभेल. बौद्धिक क्षेत्र गाजवाल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज विशेष दिवस आहे. व्यवसायात मोठी वाढ दिसून येईल. अनिष्ट बाबी दूर होतील. शंका समाधान होईल.

मकर:– (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्या राशीतील चंद्र भ्रमण खास अनुभव देईल. राजकीय क्षेत्रात दमदार वाटचाल कराल. बुद्धिबळाच्या चाली सारखी योजना कराल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) वाहन आणि औषधे यावर खर्च होऊ शकतो. मात्र तो आवश्यक ठरेल. मेजवानीत सहभागी व्हाल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम, प्रगती करणारा आणि क्षितिजे उंचावणारा दिवस आहे. व्यापारात मोठे लाभ होतील. वाहन सुख मिळेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.