ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
फाल्गुन शुक्ल पंचमी. शिशिर ऋतू. शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज वर्ज्य दिवस आहे” रवीचा मीन राशीत प्रवेश.
चंद्र नक्षत्र – भरणी/ कृतिका.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष/वृषभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र हर्षल युती भ्रम निर्माण करेल. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. व्यवहार करतांना काळजी घ्या.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) एखादा मोठा खर्च समोर येऊ शकतो. व्यावसायिक अंदाज चुकतील. आध्यात्मिक प्रगती होईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. व्यवसाय वृद्धी घडेल. अचानक लाभ संभवतात.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नोकरीच्या ठिकाणी वादविवाद टाळा. कामाचा ताण वाढेल. दगदग घडेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अर्थप्राप्ती होईल. मात्र प्रवासात त्रास संभवतो. कामानिमित्त फिरावे लागेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उष्णतेचे त्रास जाणवतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. वाहन जपून चालवा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) पत्नीशी मतभेद संभवतात. कोर्ट कामात दिरंगाई होईल. भागीदारी व्यवसायात वादविवाद टाळा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. मात्र एखादे आरोप होणार नाहीत याची काळजी घ्या.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. कामानिमित्त भ्रमंती होईल. कोणावर अन्याय होणार नाहीत याची काळजी घ्या.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) महत्वाचे करार आज नकोत. जमिनीची मशागत करण्यात वेळ जाईल. शेतात फिरताना काळजी घ्या.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आज भलते साहस नको. अंगाशी येईल. सारासार विचार करून निर्णय घ्या.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कौटुंबिक मतभेद संभवतात. स्थावर संपत्तीचे वाद सामोपचाराने टाळा. संपत्तीचे प्रदर्शन नको.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव”या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)