आजचे राशिभविष्य गुरूवार,२३ मे २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
वैशाख पौर्णिमा.ग्रीष्म ऋतू.क्रोधीनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज सकाळी ९.०० नंतर चांगला दिवस आहे”*बुद्धपौर्णिमा,वैशाख स्नान समाप्ती*
चंद्र नक्षत्र -विशाखा . 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -वृश्चिक.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) तुमच्या अष्टम स्थानी पौर्णिमा आहे. मानसिक आरोग्य सांभाळा. कौटुंबिक मतभेद संभवतात. घशाची काळजी घ्या.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) गुरू शुक्र युती आहे. भौतिक सुखे आणि विरक्ती यात मन दोलायमान होईल. पत्नीची काळजी घ्या.

मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभ होतील. मात्र खर्च वाढेल. सत्य आणि सचोटी सोडू नका. अन्यथा मोठे नुकसान संभवते.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)  रवी, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. ग्रहांचे मोठे पाठबळ मिळत आहे. त्याचा लाभ घ्या. आनंदी राहाल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सामाजिक कार्यात भाग घ्याल. राजकारणात रस निर्माण होईल. सरकारी कामे मार्गी लागतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) भाग्योदय होईल. लक्ष्मी प्रसन्न राहील. उच्च शिक्षणात यश मिळेल. दूरचे प्रवासाचे नियोजन कराल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. स्त्रीधन वाढेल. प्रिय व्यक्ती भेटेल. खर्च देखील वाढणार आहे.

वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  तुमच्याच राशीत चंद्र आहे. इतरांच्या सहकार्य शिवाय आपले काम पुढे सरकणार नाहीये.आज त्या बाबतीत निराशा होऊ शकते. संयम ठेवावा लागेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र ग्रहमान आहे. अनुकूल रवी तुम्हाला मदत करेल. सरकारी कामातून लाभ होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) चंद्र अनुकल आहे. आनंदी राहाल. कामे मार्गी लागतील.  नोकरीत/ कामात काही चुका होऊ शकतात.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  अनुकूल रवी, शुक्र समाधान देईल. व्यवसाय वाढेल. नोकरीत शुभ घटना घडतील. योग्य विश्रांती घ्या.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) ग्रहमान प्रसन्न आहे. मदत मिळणार आहे. स्वप्ने साकार होतील. यश मिळेल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.