शनिवार नाशिक शहरातील पाणीपुरवठा बंद 

रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा

0

नाशिक,दि,२२ मे २०२४ – असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नाशिक शहरातील नागरीकांसाठी महत्वाची बातमी सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणी पुरवठा वितरण व यांत्रिकी विभागाच्या वतीने शहरातील विविध भागात देखभाल दुरुस्तीचे कामे हाती घेत असल्याने शनिवार दि.२५ मे २०२४ रोजी नाशिक  शहरातील पाणीपुरवठा बंद राहील तसेच रविवार दि.२६ मे २०२४ रोजी सकाळचा  कमी दाबाने पाणी पुरवठा होईल तरी नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणी पुरवठा वितरण व यांत्रिकी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणी पुरवठा वितरण व यांत्रिकी विभागातील खालील प्रमाणे कामे करण्यात येणार आहे.
मनपाचे गंगापुर धरण पंपिग स्टेशन येथे सिक्स पोल स्ट्रक्चरवर आयसोलेटर उभारणी व संबधित कामे मुकणे धरण पंपिंग स्टेशन येथील सबस्टेशनमधील कामे विविध जलशुध्दीकरण केंद्र येथील सबस्टेशनमधील कामे, पीटी बदलणे. इ. कामे करणेचे नियोजन यांत्रिकी विभागामार्फत करण्याचे नियोजन करणेत आलेले आहे. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या विविध कामांकरीता आणि वितरण विभागातील विविध ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या तसेच उप वितरण वाहिन्यांची दुरुस्ती तसेच व्हॉलची दुरुस्ती, व्हॉल बदलणे इत्यादी देखभाल दुरुस्तीचे कामे पाणी पुरवठा सुरळीत होणेकामी हाती घेणे आवश्यक आहे. त्यामुळे नाशिक महानगर पालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा शनिवार दि.२५/०५/२०२४ रोजी पुर्ण दिवसहोणार नाही व रविवार दि. २६/०५/२०२४ रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे ही विनंती.

नाशिक पुर्व  विभाग
१)नाशिक पुर्व प्र.क्र. १५ मधील भाभानगर गुरुत्वावाहिणी टाकणे या कामात ७०० मी.मी व्यासाची मुख्य गुरुत्वावाहिणी वरुन ५०० मी. मी व्यासाची गुरुत्वावाहिणी क्रॉस कनेक्शन करणे.
२) नाशिक पुर्व प्र.क्र.३० मधील चडडा पार्क जलकुंभा समोर मुख्य गुरुत्वावाहिणीचा ७०० मी.मी.व्यासाच्या व्हॉलचे लिकेज बंद करणे.
३)  पाथर्डी फाटा येथिल ४५० मी.मी व्यासाची पाईप लाईनवर Air Valve बलदणे.

नाशिक पश्चिम विभाग- देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे.
पंचवटी विभाग 
१) प्र.क्र. १ मधील राहु चौक मारुती मंदीराजवळील एअर व्हॉलचा पाईप बदलणे.
२) आडगांव धात्रक फाटा हायवेलगत मदर तेरेसा जवळ पाईपलाईन दुरुस्ती करणे.
३)तारवाला नगर तलाठी कॉलनी चौफुली जवळ ५०० मी.मी. व्यासाची पाईपलाईन क्रॉस कनेक्शन करणे.
४) स्मार्ट सिटी कामाअंतर्गत सुरु असलेले जलशुध्दीकरण केंद्र पंचवटी येथील पाईपलाईन शिफटींग व इतर अनुषंगीक कामे करणे.

नाशिकरोड – देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे.
सातपुर विभाग
१)  सातपुर विभागातून गंगापूर पंपिंग स्टेशन ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र येथे जाणाऱ्या रॉ वॉटर १२०० मी. मी पीएससी पाइप लाइन वर vaccum breaker air valve बसविणे.
२)  प्रभाग क्र. ९छत्रपती शिवाजी विद्यालय कार्बन नाका समोर असलेल्या १२०० मी मी gravity mains पाइप लाइन वरील होत असलेली पाणी गळती बंद करणे.
३) प्रभाग क्र. ९ शिवाजी नगर फिल्टर रोड, देवश्री इस्टेट अपार्टमेंट ला लगत असलेल्या १२०० मी मी gravity mains पाइप लाइन वरील चालू असेलली पाणी गळती बंद करणे.
४)  प्रभाग क्र.८ बळवंत नगर नवीन जलकुंभ करिता ५०० mm Gravity mains वर inlet cross connection करणे

नविन नाशिक
१)अंबड स्मशान भुमीजवळ ८०० मी.मी. व्यासाची पी.एस.सी. पाईपलाईनचे लिकेज बंद करणे.
२) अंबड जलकुंभाजवळील ४५० मी.मी.व्यासाचा व्हॉल दुरुस्ती करणे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.