आजचे राशिभविष्य मंगळवार,१० डिसेंबर २०२४

0

मार्गशीष शु,१० 
राहुकाळ – दुपारी १.५० ते दुपारी ३.११ 
नक्षत्र – पूर्व भाद्रपदा 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -मीन 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) विनाकारण चिडचिड होईल. फसवणूक होऊ शकते. गृहकलह टाळा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सामान्य दिवस आहे. काही लाभदायक प्रसंग येतील. मोठे निर्णय आज नकोत.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) लाभ होतील. मात्र ते पुरेसे नसतील. मेहनत वाढवावी लागेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नोकरीच्या ठिकाणी काळजी घ्या. सहकारी विशेष सहकार्य करणार नाहीत. व्यवसायात माफक यश मिळेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस नाही. एखाद्या निर्णयाचा फटका बसू शकतो. काळजी घ्या.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. मात्र आरोग्याची काळजी घ्या. चुकीची औषध योजना होऊ शकते.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  कामाचा ताण वाढेल. प्रवासात काळजी घ्या. विंचू काट्याचे भय आहे.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) ज्ञानपीपासा वाढेल. अभ्यास कराल. नवनवीन संशोधन घडेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अंदाज चुकत. कामे रेंगाळतील. भ्रमित होऊ शकतात. काळजी घ्या.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संशय कल्लोळ टाळा. जोडीदाराला विश्वासात घ्या. नवीन करार आज नकोत.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अति महत्वाकांक्षा नको. धाडस अंगाशी येईल. लेखकांनी काळजी घ्यावी.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) गूढ विद्यांची गोडी लागेल. योग्य गुरूचा शोध घ्या. खाण्यावर बंधन आवश्यक आहे. घशाची काळजी घ्या.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.