आजचे राशिभविष्य मंगळवार,३ डिसेंबर २०२४

0

जागतिक अपंग दिन,
मुस्लिम जमादिलाखर मासारंभ 
राहुकाळ – दुपारी १.४७ ते दुपारी ३.०९ 
नक्षत्र – मूळ 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यंत प्रतिकूल दिवस आहे. अष्टमी स्थानी अमावस्या आहे. प्रशासकीय कामात लक्ष घालावे लागेल. आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) शत्रू डोके वर काढतील. व्यावसायिक कटकटी उदभवू शकतात. पत्नीशी मतभेद संभवतात.

मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक आवक वाढेल. अचानक लाभ होतील. प्रवासात त्रास संभवतो.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अति धाडस नको. शेअर्स मध्ये जपून गुंतवणूक करा. संततीची काळजी घ्या.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) राहत्या घराजवळ विनाकारण वाद टाळा. सामाजिक कार्यात काम करताना त्रास जाणवेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)  संमिश्र दिवस आहे. आवक वाढेल मात्र खर्चात देखील वाढ होऊ शकते. मोठे निर्णय नकोत.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक नियोजन चुकू शकते. कौटुंबिक वादविवाद टाळा. मोजके बोला.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अधिकाराचा दुरुपयोग नको. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. अपघाताचे भय आहे.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल दिवस आहे. कोणतेही मोठे निर्णय घेऊ नयेत. अपमानाचे प्रसंग येऊ शकतात.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) भिन्न लिंगी व्यक्तीकडून लाभ होतील.कौटुंबिक वाद विवाद असल्यास मिटतील.वाटचाल सुकर होईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यावसायिक यश लाभेल. काम मन मन गुंतेल. छोटे प्रवास घडतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे.स्त्रीधन वाढेल.आध्यात्मिक लाभ होतील.प्रश्न सुटतील.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.