आजचे राशिभविष्य मंगळवार,२ जानेवारी २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी. हेमंत ऋतू.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज संध्याकाळी ५.०० पर्यंत चांगला दिवस”
नक्षत्र – पूर्वा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह/कन्या.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अचानक लाभाचा दिवस आहे. काहीतरी नवीन चांगली बातमी समजेल. संध्याकाळ विश्रांतीची.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) स्वतःच्या चैनीसाठी खर्च कराल. मैत्री जपावी लागेल. उत्तरार्ध चिंता निर्माण करणारा असू शकतो.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक दृष्टीने अनुकल दिवस आहे. कामे पूर्ण करा. गृहकलह टाळा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) तुमच्या स्वभावाला न शोभणारे कठोर निर्णय आज घ्यावे लागतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. जेष्ठ व्यक्तीकडून लाभ होतील. उत्तरार्धात मन शांत ठेवावे लागेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दिवसाचा पूर्वार्ध प्रतिकूल आहे. वादविवाद टाळा. उत्तरार्धात तुमचा दबदबा वाढेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अतिशय उत्तम दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. वेळ दवडू नका. संध्याकाळ चिंतेची.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल ग्रहमान आहे. योग्य दिशेने वाटचाल होईल. उत्तरार्ध अधिक लाभाचा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) गूढ उलगडतील. अध्यात्म आणि भौतिक सुख यात मन दोलायमान होईल. योग्य निर्णय घ्या.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. प्रलोभने समोर येतील. सारासार विचार करा. संयम आवश्यक आहे.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रणयरम्य दिवस आहे. मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. मात्र क्रोधावर नियंत्रण ठेवा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) काही चांगले निर्णय होतील. आर्थिक आवक वाढेल. राजाआश्रय लाभेल. उपासना लाभदायक ठरेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!