ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
पौष शुक्ल त्रयोदशी. हेमंत ऋतू.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज सकाळी ८.०० पर्यंत चांगला दिवस आहे”*भौम प्रदोष*
नक्षत्र – आर्द्रा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यंत अनुकूल दिवस आहे. आर्थिक बाजू भक्कम होईल. प्रशासकीय कामे वेळेत पूर्ण करा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक चिंता कमी होतील. मित्रमंडळी भेटतील. इच्छापूर्ती होईल. मात्र कुलदेवतेची उपासना आवश्यक आहे.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) तुमच्याच राशीत चंद्र आहे. गुरुशी शुभ योग् करत आहे. ऐश्वर्य लाभेल. वाहन सुख मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नोकरीत मनासारखी कामे होतील. वाहनापासून त्रास संभवतो. चोरीचे भय आहे. खिसा पाकीट सांभाळा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. चांगल्या घटना घडतील. मात्र आरोग्य सांभाळा. भलते धाडस नको.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. कर्ज प्राप्ती होईल. नवीन कामाबद्दल आशा पल्लवित होतील. पाळीव पशूंपासून काळजी घ्या.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उच्च शिक्षणात यश लाभेल. काही महत्वाचे निर्णय आज घ्यावे लागतील. भावंड नाराज होतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) प्रतिकूल दिवस आहे. बोलण्यातून गैरसमज वाढतील. गृहकलह टाळा. राजकीय क्षेत्रात अपेक्षाभंग होईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) तुमचा स्वभाव शांत असला तरी आज कठोर भूमिका घेतली जाईल. त्यामुळे नुकसान होईल. पत्नीशी मतभेद. कनिष्ठ सहकार्य करणार नाहीत.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूलता नाही. इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून नुकसान होईल. सरकारी कामे वेळेत पूर्ण करा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) बुध, मंगळ, शुक्र अनुकूल आहेत. आळस झटकून कामाला लागा. प्रतिष्ठेसाठी खर्च कराल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नोकरीत काही गैरसमज होऊ शकतात. कौटुंबिक सौख्य लाभेल. भाडेकरूंचा त्रास जाणवेल.
(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
