आजचे राशिभविष्य,मंगळवार,१२ मार्च २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
फाल्गुन शुक्ल द्वितीया/ तृतीया. शिशिर ऋतू. 
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज क्षय तिथी आहे”   
नक्षत्र – रेवती/अश्विनी. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन/मेष.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) नोकरीच्या ठिकाणी अधिकारात वाढ होईल. सहकाऱ्यांना मेजवानी द्यावी लागेल.उत्साह कमी होऊ देऊ नका.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. लक्ष्मी प्रसन्न होईल. नफा वाढेल. भाग्योदय होईल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. कामाचा ताण वाढेल. अडचणी दूर होतील. वाहन जपून चालवा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) चोरी मुळे होणारे नुकसान थोडक्यात टळेल. प्रतिस्पर्धी पराभूत होतील. कोर्ट कामात यश मिळेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र कालावधी आहे. महत्वाचे करार आज नकोत. वाहन जपून चालवा. काळजी घ्या.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उपासना फळास येतील. पत्नीधी उत्तम साथ लाभेल मात्र वरचष्मा राहील. इष्ट दैवताची उपासना उत्तम लाभ मिळवून देईन.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक लाभ वाढत राहतील. संकट टळेल. प्रतिष्ठा वाढेल. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना उत्तम दिवस आहे.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लहान भावंडांकडून लाभ होतील. नवीन समीकरणे जुळतील. अचानक लाभ संभवतात. कार्यकुशलता वाढेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) घरगुती कामात वेळ द्यावा लागेल. मन आनंदी राहील. सामाजिक वजन वाढेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम दिवस आहे. तुमच्या स्वभावाला अनुसरून स्पष्ट आणि कडक निर्णय घेतले जातील.रोख ठोक बोलण्याने कामे पुढे सरकतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) काहीसा खर्चात टाकणारा दिवस आहे. काही चांगल्या बातम्या समजतील. वाहन आणि यंत्र जपून हाताळा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अत्यंत अनुकूल दिवस आहे. मंगळाचे मोठे सहकार्य लाभेल. येणी वसूल होतील. अधिकार वाढतील. दबदबा राहील.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!