राहूकाळ- सकाळी ९.३४ ते १०.५८
नक्षत्र -पुनर्वसु
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चांगली कमाई होणार आहे. स्त्री धनात वाढ होईल. प्रवासात काळजी घ्या.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) भिन्न लिंगी व्यक्तीकडून लाभ होतील. व्यापारात मोठा फायदा होईल.आनंदी राहाल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. महत्वाची कामे पूर्ण करा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मौल्यवान खरेदी होईल. संतती कडून खुश खबर मिळेल. शिक्षणात उत्तम यश लाभेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) गृह कर्तव्य पार पडेल. आप्त भेटतील. नातेवाईक/ मित्र याना वेळ द्यावा लागेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) मन प्रसन्न राहील. मौजेवर खर्च कराल. भौतिक सुखे प्राप्त होतील. लेखनातून आनंद मिळेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) चैनीवर खर्च कराल. बौद्धिक कामात यश मिळेल. नेतृत्व गुण दिसून येईल.
वृश्चिक:-(तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अत्यंत शुभ दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. कष्टाचे चीज होईल. संधीचा फायदा घ्या.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. नोकरीच्या ठिकाणी जरा वेगळे अनुभव येतील. महिलांकडून लाभ होतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अतिशय उत्तम दिवस आहे. सर्वार्थाने सौख्य प्रदान करणारा कालावधी आहे. वाहन सुख लाभेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) स्त्री धन वाढेल. अचानक भेटी मिळतील. कार्तिक अडचण दूर होईल. व्यवसायातून लाभ होतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रेममय दिवस आहे. कधी तरी त्याग केला होता त्याचे शुभ फळ मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील.