आजचे राशिभविष्य,बुधवार,१४ फेब्रुवारी २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
माघ शुक्ल चतुर्थी/पंचमी. शिशिर ऋतू. 
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज उत्तम दिवस आहे” *वसंत पंचमी, श्री पंचमी*
नक्षत्र – रेवती. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन/मेष.   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल आहे. सरकारी कामे पुढे सरकतील. सन्मान प्राप्त होईल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. कामाचा ताण वाढेल. वरिष्ठ खुश राहतील. प्रवासात त्रास संभवतो.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम दिवस आहे. पित्याकडून लाभ होतील. संपन्न वारसा लाभेल. वाहन जपून चालवा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामात लक्ष द्यावे लागेल. पत्नीशी मतभेद संभवतात. प्रेमात धोका मिळू शकतो.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दिवसाचा उत्तरार्ध चांगला आहे. शत्रू पराभूत होतील. सरकारी कामात प्रगती होईल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) प्रतिकूल दिवस आहे. अति धाडस नको. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अधिक विचार करा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) मुलांच्या परदेशगमनाचे योग आहेत. उपासना केल्यास दैवत संतुष्ट होईल. आशीर्वाद मिळतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कामात प्रगती होईल. अर्थप्राप्ती होईल. वारसा हक्काने लाभ मिळतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. प्रेमात यश मिळेल. कठोर बोलणे टाळा. छंद जोपासले जातील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) जमीन व्यवहारातून लाभ होतील. येणी वसूल होतील. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. कामाचा वेग वाढेल. राग आटोक्यात ‘न’ ठेवल्यास नुकसान होऊ शकते.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. अधिकार वाढतील.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.