अर्जुन-सावीमध्ये परत पेटणार पिरतीचा वनवा 

0

मुंबई,दि,१३ फेब्रुवारी २०२४ –कलर्स मराठीवरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अर्जुन आणि सावीच्या नात्याला दुराव्याचं सत्य जगासमोर येणार आहे. प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते अखेर तो क्षण या व्हॅलेंटाईन डेला अनुभवायला मिळणार आहे. म्हणजेच अर्जुन सावीच्या नात्याला दुरावा संपणार.आतापर्यंत सावीने नेहमीच अर्जुनसाठीचं प्रेम व्यक्त केलं. पण अर्जुनने सावीच्या भूतकाळामुळे तिला स्वतःपासून दूर केलं.

येत्या १५ फेब्रुवारीच्या भागात अर्जुन सावीचा स्वीकार करणार आहे. व्हॅलेंटाईन डेसाठी अर्जुनने सावीसाठी स्पेशल सरप्राईज प्लॅन केला आहे. आता अर्जुन सावीसाठीचं प्रेम व्यक्त करणार आहे.  या दोघांचे रोमांटिक मोमेंट्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. सावीला गुलाब देऊन प्रोपोज़ करणार आहे, तिच्यासोबत रोमँटिक डान्स बघायला मिळणार आहे. आतापर्यंत सावीने अर्जुनला प्रत्येक संकटात साथ दिली. या पुढे प्रेक्षकांना अर्जुन-सावी एकत्र लढताना दिसणारं आहे. सावी अर्जुनच्या साथीने दुश्मनांची करणार लेव्हल आणि दोघांच्या प्रेमाचा गोडवा राहणार कायम अतूट.

अर्जुन सावीच्या नात्यातील दुराव्याची संधी साधून फायदा करून घेण्याचा प्लान खलनायकांचा आहे. पण या गेमचे खरे राजा राणी अर्जुन सावी आहेत. आता नेमकं असं काय झालं ज्यामुळे अर्जुन-सावी एकत्र आहे? नात्यातलं हे सत्य सगळ्यांपासून का लपवलं? या दुराव्याच्या नाटकाचं नेमकं कारण काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तर १४ फेब्रुवारीच्या भागात पाहल्या मिळतील तेव्हा नक्की पाहा, ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’, सोम-शनि, रात्री. १०.०० वा. कलर्स मराठीवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.