लोभस,मस्तीखोर,अवखळ ‘इंद्रायणी’,२५ मार्चपासून येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला.

0

मुंबई,दि,१७ फेब्रुवारी २०२४ –कलर्स मराठीने अलीकडेच ‘इंद्रायणी’या नव्या मालिकेची घोषणा केली.येत्या २५ मार्चपासून इंद्रायणी मालिका सर्वांच्या भेटीला येणार आहे.या मालिकेतील इंद्रायणी नेहमी आपल्या निरागस प्रश्नांनी व खट्याळ स्वभावाने सर्वांना विचारात पाडते.या लहान मुलीची कहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मालिकेच्या पहिल्या टिझरमध्ये पाहिल्याप्रमाणे इंद्रायणी व तिचे  मित्र त्यांच्या मस्तीने सर्वांनाच सळो कि पळो करून सोडतात.नुकताच इंद्रायणीचा नवा टिझर आला आहे. ज्यात इंद्रायणीची आणखी एक झलक पाहायला मिळते आहे. ही निरागस इंद्रायणी आपल्या खट्याळ आणि खोडकर स्वभावाने सर्वांना प्रेमात पडणार आहे.या टिझरमध्ये अभिनेत्री अनिता दाते व अभिनेता संदीप पाठक यांच्यासारखे उत्तम कलाकार ही पाहायला मिळत आहेत. मालिकेचा टिझर पाहून प्रेक्षक इंद्रायणीला भेटण्यासाठी उत्सुक आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.