ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
पौष शुक्ल नवमी. क्रोधीनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज उत्तम दिवस आहे”
नक्षत्र: अश्विनी/भरणी.
आज जन्मलेल्या बाळाची राशी- मेष.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यंत अनुकूल दिवस आहे. चंद्राचा शुक्र आणि शनीशी शुभ योग आहे. तुमची कीर्ती दिगंत पसरेल. यश मिळेल. सन्मान होईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) व्यय स्थानी चंद्र आहे. तरीही काही सुखद घटना घडतील. स्वतःसाठी खर्च कराल. घरगुती कामासाठी भ्रमंती घडेल.
मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अत्यंत उत्तम दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. शब्दास मान मिळेल. कर्जे मंजूर होतील. भौतिक सुखे प्राप्त होतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उद्योग/व्यवसायात भर घोसवाढ होईल. प्रगतीची नवी दालने खुली होतील. मनासारख्या घटना घडतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) भाग्यातील चंद्र भाग्योदय घडवून आणेल. ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील. नवीन खरेदी होईल. आयुष्याला नवीन अर्थ प्राप्त होईल.
कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अष्टम स्थानी चंद्र आहे. मात्र काही चांगले अनुभव येतील. सरकारी कामात प्रगती होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) धैर्यवान आणि बलवान बनाल. आरोग्य सुधारेल. सन्मान मिळतील. पत्नीचा सल्ला मानने हिताचे आहे.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक बाबतीत आज भाग्य उजळेल. प्रशासकीय कामे पूर्ण होतील. नवीन संधी मिळतील. व्यवसाय वाढेल. प्रवास घडतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल दिवस आहे. काही गणिते नव्याने जुळतील. व्यावसायिक संधी चालून येतील. चंद्राचा शुभ त्रिकोण योग सर्वकाही ठीक करेन.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) बऱ्याच दिवसांनी तुम्हाला शांतता लाभेल. सरकारी पदे मिळतील. आरोग्याचे प्रश्न अजूनही आहेतच. त्याकडे दुर्लक्ष नको.
कुंभ:– (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील. दागिने, तयार कपडे विक्री करणाऱ्यांना उत्तम यश मिळेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. विविध प्रश्न मार्गी लागतील. अडचणी दूर होतील. नात्यातून लाभ होतील. प्रवास घडतील.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
