ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
फाल्गुन शुक्ल चतुर्थी.शिशिर ऋतू.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज दुपारी ०३.०० पर्यंत चांगला दिवस आहे”*विनायकी चतुर्थी*
नक्षत्र – भरणी/कृतिका.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) तुमच्याच राशीत चंद्र गुरू युती आहे. अनुकूल शुक्र, शनी योग आहेत. तुमच्या इच्छापूर्ती करणारा दिवस आहे. वेळ दवडू नका.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. खर्च झाला तर तो योग्य कारणासाठी होईल. दानधर्म केल्यास उत्तम फलित मिळेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम ग्रहमान आहे. सर्व इच्छा पूर्ण करणारा दिवस आहे. प्रवास घडतील. आनंदी राहाल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नोकरी व्यवसायात मोठी घोडदौड होईल. नवीन संधी चालून येतील. अनुकूलता वाढेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) मोठे प्रवास घडतील. गुरू सन्निध लाभेल. प्रेमात यश मिळेल. शुभ समाचार समजतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. आर्थिक बाजू मजबूत होईल. भ्रमंती घडेल. दगदग वाढेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सप्तम स्थानी गुरू चंद्र युती आहे. सर्वार्थाने चांगला दिवस आहे. जोडीदाराला वेळ द्याल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. अर्थकारण चांगले चालू राहील. नैतिक बाबींसाठी वेळ आणि पैसे खर्च कराल.आरोग्यात सुधारणा होईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम ग्रहमान आहे. संतती बाबत शुभ समाचार समजतील.दागिने मिळतील. खुश राहाल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कलाकारांना उत्तम दिवस आहे. नवीन संधी मिळतील. मेजवानी मिळेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक बाबतीत उत्तम दिवस आहे. कामे पूर्ण होतील.लेखनातून लाभ होतील. तुमच्या हस्ते चांगले काम घडेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मेजवानी मिळेल. पाहुणे येतील. स्वतःच्या चैनीवर खर्च कराल. अंतर्मुख व्हाल.
(कुंडलीवरून करियर,लग्न,व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव”या फेसबुक पेजला भेट द्या.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -8087520521)
