अश्विन कृष्णसप्तमी
राहुकाळ -सकाळी ९.२६ ते १०.५२
“आज दुपारी २.०० पर्यंत चांगला दिवस आहे
नक्षत्र – पुनर्वसू
आज जन्मलेल्या बाळाची राशी -मिथुन
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा नवम स्थानातून हर्षलशी शुभ योग आणि शुक्राशी युती आहे. मौल्यवान खरेदी होईल. दूरचे प्रवास घडतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. काळजी दूर होईल. आर्थिक लाभ होतील. भेटवस्तू मिळतील. मात्र खर्च देखील वाढेल.
मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रेमात पडण्याचा दिवस आहे. प्रिय व्यक्तीसाठी वेळ द्याल. अचानक लाभ होतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) तुमच्या कामात अचानक मदत मिळेल. चिंता दूर होतील. अधिकारात वाढ होईल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अत्यंत शुभ दिवस आहे. अकल्पित लाभ होतील. लॉटरी मधून यश मिळू शकते. शेअर्स मध्ये जरूर गुंतवणूक करा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) खनिज संपत्ती, स्फोटके, रसायने यात काम करणाऱ्या व्यक्तींना विशेष लाभ होतील. पूर्वजांची पुण्याई फळाला येईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) तुमच्या स्वभावाचा विपरीत कार्य कराल. कठोर भूमिका घ्याल. पीडा दूर होतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दागिने खरेदी होईल. शब्द भांडार कामी येईल. अपेक्षित कामे पूर्ण होतील. अनिष्ट गोष्टी पासून कटाक्षाने दूर रहा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अचानक एखादी संधी चालून येईल. जीवनाला कलाटणी देणारा दिवस ठरू शकतो. परदेश गमन होईल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अद्याप अनुकूलता नाही. तरीही कामे मार्गी लागतील. आरोग्य सांभाळा. घशाची काळजी घ्या.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) लेखकांना उत्तम यश मिळेल. अनुकूल चंद्र आणि शुभ योग लाभदायक आहेत. वेळेचा सदुपयोग करा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) काही सुखद घटना घडतील. योग्य कारणासाठी खर्च कराल. मोजके बोलल्यास सर्वकाही निभावले जाईलपूर्वजांची पुण्याई फळाला येईल.