आजचे राशिभविष्य बुधवार,११ सप्टेंबर २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
भाद्रपद शुक्ल ज्येष्ठ/मूळ.  
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज आनंदी दिवस आहे” *गौरी पूजन* दुर्गाष्टमी. 
नक्षत्र – ज्येष्ठ/मूळ. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक/ (रात्री ९.२२ नंतर) धनु. (विष्टी करण शांती करून घ्यावी)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  चंद्राचा गुरू शी प्रति योग आणि सूर्याशी केंद्र योग आहे. फारशी अनुकूलता नाही. सांभाळून पावले टाका. मोठे करार आज नकोत.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सामाजिक कार्य करताना काळजी घ्या. विनाकारण प्रसिद्धीच्या मागे लागू नका. शत्रू वाढतील. राजकारणात प्रगती नाही.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभ होतील. मात्र मोठी जोखीम नको. मौल्यवान वस्तू सांभाळा. हाताची काळजी घ्या. नाती सांभाळा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)  फारसे धाडसी निर्णय घेऊ नका. बोलताना काळजी घ्या. शेअर्स मध्ये जोखीम नको. दत्त गुरूंची उपासना करा. दानधर्म कराल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आज आनंदी दिवस आहे. भेटवस्तू मिळतील. आनंद देणाऱ्या बातम्या समजतील. घरगुती कामे पूर्ण करावी लागतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक दृष्टीने चांगला दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. नवीन खरेदी होईल. प्रवासात काही सुखद अनुभव येतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. कर्ज मंजूर होईल. सरकारी कामे रेंगाळतील. आध्यात्मिक लाभ होतील. पैशांची व्यवस्था होईल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नेहमीच ताठर भूमिका घेऊन चालत नाही. आज गोड बोलून कामे होऊ शकतात. नोकरीत वरिष्ठ नाराज होऊ शकतात.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल दिवस आहे. मन आनंदी राहील. कष्टाचे उत्तम फळ मिळेल. हाडांचे विकार होऊ शकतात. काळजी घ्या.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आज फारशी अनुकूलता नाही. औदार्य दाखवाल. महिलां सहकारी कडून कामे करताना तारतम्य बाळगावे लागेल. काळजी घ्या.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सरकारी कामात दिरंगाई होऊ शकते. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल. घर आणि व्यवसाय यात ओढाताण होईल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नववा चंद्र काही सुखद घटना अनुभवास देईन. आर्थिक बळ वाढेल. आध्यत्मिक लाभ होतील. आरोग्याची काळजी घ्या.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.