आजचे राशिभविष्य सोमवार,६ मे २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
चैत्र कृष्ण त्रयोदशी. ग्रीष्म ऋतू. 
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – रेवती/अश्विनी. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन/ (संध्याकाळी ५.४३ नंतर) मेष.
“आज त्रयोदशी वर्ज्य दिवस आहे.” *शिवरात्री* शुक्र पूर्व लोप.  
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:- इलेक्ट्रॉनिक वस्तूची खरेदी होईल. घरातील दुरुस्ती करावी लागेल. खर्च वाढतील. प्रवासात त्रास संभवतो.

वृषभ:- अनुकूल दिवस आहे. प्रवास कार्यसाधक होतील. वक्तृत्व गाजेल. कलाकारांना लाभ होतील.

मिथुन:- नोकरी/ व्यवसायासाठी चांगला दिवस आहे. सहकारी खुश राहतील. संध्याकाळ अधिक अनुकूल आहे.

कर्क:- धनलाभ होईल.  मन शांत राहील. प्रवास घडतील. ध्यानधारणा करा. संध्याकाळी कामाचा वेग वाढेल.

सिंह:-  कामाचे नियोजन बदलेल. मानसिक त्रास जाणवेल. दुपार नंतर अनुकूलता वाढेल. आर्थिक आवक होईल.

कन्या:- सकाळी कामे पूर्ण करा. मार्ग सापडेल. अडचणी दूर होतील. भ्रमंती घडेल. नेमके नियोजन करा.

तुळ:- सौख्य लाभेल. हरवलेली वस्तू सापडेल. अडचणी दूर होतील. धनलाभ होईल.

वृश्चिक:- अनुकूल दिवस आहे. मानसिक सौख्य लाभेल. पुढील नियोजन कराल. आर्थिक बाजू मजबूत होईल.

धनु:- अनुकूल दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. मन प्रसन्न राहील. पाळीव प्राणी आनंद देतील.

मकर:- लाभ होईल. आर्थिक आवक वाढल्याने नियोजन होऊ शकेल. लेखकांना उत्तम यश मिळेल. वकील लोकांसाठी अनुकूल दिवस आहे.

कुंभ:- संमिश्र दिवस आहे. पैसे येतील तसेच जातील. खर्च वाढू शकतात. वक्तृत्व चमकेल. उत्तरार्ध चांगला आहे.

मीन:- बौद्धिक क्षेत्रात नाव मिळेल. सन्मान होतील. कौतुक होईल. सल्ला मोलाचा ठरेल. पूर्वार्ध अधिक चांगला आहे.

(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.