ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन कृष्ण अष्टमी. शरद ऋतू. दक्षिणायन. शोभननाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस आहे” *कराष्टमी, कालाष्टमी*
चंद्रनक्षत्र – पुष्य.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) फारशी अनुकूलता नाही. गृहकलह होऊ शकतो. आर्थिक नुकसान संभवते.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक व्यवहार वाढतील. स्थिती मजबूत होईल. मात्र काही अंदाज चुकतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) विनाकारण गृहकलह टाळा. आर्थिक नियोज काटेकोर करा. गैरसमज हौउ शकतात.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मानसिक सुखाला महत्व द्या. ध्यान धारणा करा. विनाकारण इतर बाबतीत पडू नका.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रतिकूल दिवस आहे. कोणताही धोका पत्करू नका. नवीन आकर्षणे येतील त्यापासून दूर रहा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. तरीही फार मोठे करार नकोत. नाराज मंगळ, गुरू यांची काळजी घ्या. अधार्मिक कार्य हातून घडू देऊ नका.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नोकरी आणि घर यात संतुलन साधावे लागेल. कामाचा ताण वाढणार आहे. मनाची तयारी करा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) जेष्ठ व्यक्तीची काळजी वाटेल. नवीन नाती निर्माण होतील. वाहन जपून चालवा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल दिवस आहे. काळजीपूर्वक मार्गक्रमण करा. विनाकारण कोणताही धोका पत्करू नका. वाद विवाद टाळा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मौल्यवान वस्तू आणि नाती सांभाळा. पत्नीशी विचार विनिमय करा. संशय कल्लोळ टाळा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. फारशी धावपळ करू नका. विश्रांती घ्या. दगदग जाणवेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक जोखीम घेऊ नका. कोणतीही घाई नको. जपून निर्णय घ्या. उधारी नको.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
