आजचे राशिभविष्य मंगळवार,८ एप्रिल २०२५ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
चैत्र शुक्ल एकादशी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.   
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज सकाळी ८.०० पर्यंत चांगला दिवस आहे”  *कामदा एकादशी* 
चंद्रनक्षत्र – आश्लेषा/(सकाळी ७.५५ नंतर) मघा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी –  कर्क/सिंह. (शूल योग, नक्षत्र गंडांत आणि विष्टी करण शांती करून घ्यावी)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  चंद्राचा हर्षलशी (अशुभ) केंद्र योग आहे. दिलेला शब्द पाळावा लागेल. वरिष्ठ नाराज होऊ शकतात. घशाची काळजी घ्या.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) दबदबा वाढेल. अधिकारात बदल होतील. आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल. मात्र क्रोधावर नियंत्रण ठेवा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कौटुंबिक कार्यात सहभागी व्हाल. दानधर्म कराल. दुर्बल लोकांना मदत कराल. कठोर वागणे टाळा. भाषेवर नियंत्रण ठेवा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) तुमच्याच राशीत सकाळी चंद्र आहे. काही अडचणी दूर होतील. स्वप्ने पूर्ण होतील. दिवस सत्करणी लावा. प्रवास घडतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे)  संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. आध्यात्मिक लाभ होतील. अधिक मेहनत करावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी कटू अनुभव येऊ शकतात.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र ग्रहमान आहे. आर्थिक लाभ होतील. प्रतिष्ठा जपण्यासाठी खर्च करावा लागेल. प्रवासात अडचणी येऊ शकतात.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक लाभ होतील. नोकरीत नवीन संधी मिळतील.  कामानिमित्त प्रवास घडतील. सुसंवाद वाढेल. अप्रिय बातमी येऊ शकते.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)अनुकूल चंद्र आहे. स्पर्धेत यश मिळेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. गूढ उलगडतील. कोर्ट कामात दिरंगाई जाणवेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. सुरुवात फारशी चंगली नाही. उत्तरार्ध अनुकूल आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी घ्या. दानधर्म करण्यास उत्तम दिवस आहे.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. जुने वाद मिटवा. संयमाची भूमिका घ्या. प्रेमात अपयश संभवते. शेअर्स मध्ये मोठे नुकसान होऊ शकते.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सकाळी ८.०० नंतर अनुकळता वाढेल. आर्थिक लाभ होतील. शेतीतून उत्तम लाभ होतील. व्यवसाय वाढेल. जंगलात फिरताना काळजी घ्या.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक लाभ होतील. स्पर्धेत यश मिळेल. छोटे प्रवास घडतील. लेखकांनी काळजी घ्यावी.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!