प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन 

0

मुंबई,दि,१० ऑक्टोबर २०२४ – Ratan Tata Passed Away भारताच्या उद्योगविश्वातील रत्न  टाटा समूहाचे माजी अध्यक्ष  प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा  यांचे (दि.९) निधन झाले. मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.ते ८६ वर्षांचे होते.गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होत चालल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. देशासाठी आदर्श व्यक्तिमत्वाचा, शालिन उद्योगपती आपल्यातून गेला आहे. रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशासह उद्योग विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. भारतीय उद्योगसमूहाचं एक प्रेमळ आणि सोज्वळ असं स्वरुप रतन टाटा यांचं होतं.

ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त सोमवारी आलं होतं. त्यानंतर रतन टाटांनीच त्यांच्या प्रकृती बद्दल माहिती दिली होती. वाढत्या वयामुळे नियमित वैद्यकीय तपासणी होत असल्याचं टाटांकडून सांगण्यात आलं होतं. आज संध्याकाळी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आलं. त्यानंतर त्यांच्यासाठी देशभरातून प्रार्थना सुरु होत्या. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. काही वेळापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली.

बुधवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती बिघडली. काही वेळातच त्यांनी जगाचा निरोप घेतला.रतन टाटांच्या निधनानं देश शोकसागरात लोटला गेला आहे. टाटा रुग्णालयात गेले असल्याचं वृत्त सोमवारी आल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली. अनेकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या. आज संध्याकाळी त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं वृत्त आलं होतं. त्यानंतरही देशभरातून प्रार्थना सुरु झाल्या. टाटांनी देशासाठी दिलेलं योगदान मोलाचं आहे.

संवेदनशीलपणा कायम जपणारा, सढळ हस्तानं मदत करणारा उद्योगपती अशी रतन टाटांची ओळख होती.आयुष्यभर त्यांनी ती जपली. त्यांचा साधेपणा अनेकांसाठी कुतूहलाचा विषय राहिला. टाटा आयुष्यभर साधेपणानं जगले. टाटा समूहानं कोणताही उद्योग सुरु करताना आधी देशाचा विचार केला. देशाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी अनेक उद्योग सुरु केले. समूहाची ही परंपरा टाटांनी कायम ठेवली. उच्च नैतिक मूल्य जपण्याचं काम त्यांनी केलं. संकटाच्या काळात त्यांनी देशाला कायम साथ दिली. कोणत्याही अडचणीत ते ठामपणे, निर्धारानं उभे राहिले. त्यामुळे ते देशाचे लाडके झाले.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.