सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन 

0

मुंबई,दि,१४ ऑक्टबर २०२४ –मराठी रंगभूमी सह चित्रपट, जाहिरात क्षेत्रात आपला अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे यांचं निधन झालं असल्याची बातमी समोर आलेली आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी अतुल परचुरे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वार शोककळा पसरली आहे. नाटक,सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांवर अतुल परचुरे यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली होती.

मागील अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते. इतकच नव्हे तर त्यांनी कर्करोगावर मात करत रंगभूमीवरचा अंक सुरुच ठेवला होता.त्यांच्या या नव्या अंकाचं अनेकांनी भरभरुन कौतुक केलं होतं. इतकच नव्हे तर त्यांनी नुकतच सुर्याची पिल्ले या नाटकाचीही घोषणा केली होती. त्यामुळे अतुल परचुरे हे रंगभूमीवरुन पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासही सज्ज झाले होते. परंतु पाच दिवसांपूर्वी त्याला पुन्हा त्रास होत होता म्हणून अॅडमिट करण्यात आलं होतं

अतुल परचुरे हे अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंजत होते. पण या सगळ्यावर मात करत पुन्हा एकदा रंगभूमीवर एक दमदार प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यासाठी त्यांनी सुर्याची पिल्ले या नाटकाची निवडही केली होती. पण काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. पण आता अतुल परचुरे यांनी जगाचा निरोप घेतला असून एक हरहुन्नरी कलाकार मराठी सिनेसृष्टीने गमावला असल्याची भावना प्रत्येकाची आहे. मात्र आज त्यांनी अकाली एक्झिटने कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.