मुंबई – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर कमी होत आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण कमी होत आहे त्या भागातील निर्बंध शिथिल करावे अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, राज्यातल्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत.यासंदर्भात अंतिम प्रस्ताव सहीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला असून मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर त्यावर येत्या एक ते दोन दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. त्यामध्ये शिथिलता दिली जाईल असे हि आरोग्यमंत्री टोपे म्हणाले सध्या .वीकेंडला शनिवार-रविवार पूर्णपणे बंद आहे त्या ऐवजी शनिवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत दुकानं सुरू राहतील आणि फक्त रविवारीसर्व व्यवहार संपूर्ण बंद ठेवले जातील असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ज्या खासगी कार्यालयांतील सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं आहे अशा ठिकाणी ५० टक्के कर्मचारी क्षमतेनुसार कार्यालये सुरू करण्याची मुभा अशा गोष्टींचा समावेश असेल. शॉप, रेस्टॉरंट, चित्रपटगृह या गोष्टींना या अटी लावून त्या सुरू करण्यात येऊ शकेल असे ही प्रस्तावात म्हंटले आहे.
या जिल्ह्यांमध्ये मात्र निर्बंध कायम राहणार