१८ वी महाराष्ट्र राज्य बालनाटय स्पर्धचा निकाल जाहीर
१८ वी महाराष्ट्र राज्य बालनाटय स्पर्धत नाशिक-अहमदनगर केंद्रातून मी तुझ्या जागी असते तर.? प्रथम
मुंबई – १८ व्या महाराष्ट्र राज्य बालनाटय स्पर्धेत नाशिक- अहमदनगर केंद्रातून सप्तरंग थिएटर, अहमदनगर या संस्थेच्या मी तुझ्या जागी असते तर…? या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. तसेच नाटयसेवा थिएटर्स, नाशिक या संस्थेच्या तुला इंग्रजी येत का ? या नाटकास द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे नाशिक – अहमदनगर केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक आरती अकोलकर (नाटक- मी तुझ्या जागी असते तर ? ), द्वितीय पारितोषिक रोहीत जाधव (नाटक- तुला इंग्रजी येत का ?), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक कृतार्थ कंसारा (नाटक तुला इंग्रजी येत का ?), द्वितीय पारितोषिक प्रा. राम कोरडे (नाटक सोनेरी – पिंजऱ्यातला पोपट), नेपथ्य प्रथम पारितोषिक लक्ष्मीकांत देशमुख (नाटक-गड बोलतोय), द्वितीय पारितोषिक दिपक अकोलकर (नाटक- मी तुझ्या जागी असते तर ?), रंगभूषा : प्रथम पारितोषिक माणिक कानडे (नाटक- जंगलातील दुरचा प्रवास), द्वितीय पारितोषिक विशाल तागड (नाटक- भट्टी), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक हर्षदीप अहिरराव (नाटक- तुला इंग्रजी येत का ?) व मनुजा देशमुख (नाटक- मी तुझ्या जागी असते तर ?),
अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे प्रांजल सोनवणे (नाटक-ध्येय धुंद), प्रचिती अहिरराव (नाटक- तुला इंग्रजी येत का ?), मनश्री लगड (नाटक- कस्तुरी), तेजश्री साबळे (नाटक- सोनेरी पिंजऱ्यातला पोपट), गायत्री रोहकले (नाटक- मी तुझ्या जागी असते तर), अहिर (नाटक- समज), श्लोक देशमुख (नाटक- मुन लाईट मॅजीक), सुमित गर्जे (नाटक- सोनेरी पिंजऱ्यातला पोपट), श्लोक डहाळे (नाटक- गेमिंग झोन), सौरव क्षीरसागर (नाटक- तुला इंग्रजी येत का ?). दि. २० मार्च ते २३ मार्च २०२२ या कालावधीत परशुराम साईखेडकर नाटयगृह, नाशिक व माऊली सांस्कृतिक सभागृह, अहमदनगर येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १५ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. अरविंद बेलवलकर, श्री. श्रीपाद येरमाळकर आणि श्रीमती जुई बर्वे यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे.