नांदगाव मतदार संघातून समीर भुजबळ अपक्ष निवडणूक लढवणार ?

समीर भुजबळ बंडखोरीवर ठामच,कांदेंचं टेन्शन वाढलं ? छगन भुजबळांच्या वक्तव्याने संभ्रम कायम 

0

नाशिक,दि, २४ ऑक्टोबर २०२४ – नाशिक मधून मोठी बातमी समोर येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे तथा मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर भुजबळ हे नांदगाव मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून लढवणार आहेत.या संदर्भात कार्यकर्त्यांची एक बैठक काल झाली या मध्ये हा निर्णय झाला आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान या चर्चांवर आता मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे.

नांदगाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीने विद्यमान आमदार सुहास कांदे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या मतदारसंघातून छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ इच्छुक आहेत छगन भुजबळ हे आज येवला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी समीर भुजबळ यांच्या अपक्ष लढण्याच्या चर्चांबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना समीर भुजबळ हे त्यांचा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Nandgav Meeting
नांदगाव विधानसभा मतदारसंघ सौदाणे गटातील बुथ कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत  समीर भुजबळ यांनी  अपक्ष उमेदवारी करण्याचा सर्वांचा बैठकीत निर्धार करण्यात आला  या बैठकीचे छायाचित्र

समीर भुजबळ हे २८ ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. समीर भुजबळ नांदगाव विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर समीर भुजबळ यांनी देखील निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यास नांदगाव विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. आता समीर भुजबळ नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
“समीर भुजबळ हे अपक्ष लढणार असल्याची केवळ बातमी आहे. कुणी म्हणतं की समीर भुजबळ हे मशालीवर निवडणूक लढणार, कुणी म्हणतं की तुतारीवर लढणार आहेत. मात्र, समीर भुजबळ अजून कुठेही गेलेले नाहीत. ते आज माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. ते अपक्ष लढणार की नाही, याबाबत त्यांनी मला काहीही सांगितलं नाही. मीडियाला काही सांगितलं असेल तर मला काही कल्पना नाही. पण ते आता त्यांच्या निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत”,असं छगन भुजबळ म्हणाले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.