समृद्धी महामार्ग जोडणार वाढवण बंदराशी -राज्याच्या विकासात ऐतिहासिक पाऊल
समृद्धी महामार्गावरील हायटेक बोगद्याची खासियत:तापमान वाढले की सुरू होतात पाण्याचे फवारे
नाशिक, ५ जून २०२५:Samruddhi Mahamarg हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी येथे पार पडले. यानंतर नागपूर ते मुंबई हा ७०१ किलोमीटरचा महामार्ग संपूर्णपणे वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले की, हा महामार्ग लवकरच वाढवण बंदराशी जोडला जाईल. त्यामुळे हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा खऱ्या अर्थाने कॉरिडॉर ऑफ ग्रोथ ठरणार आहे. हा महामार्ग विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांना थेट जेएनपीटी व वाढवण बंदराशी जोडतो.
✅ आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार:(Samruddhi Mahamarg)
८ किमी लांबीचा इगतपुरी बोगदा – राज्यातील सर्वात लांब व देशातील सर्वाधिक रुंद बोगदा.
डेन्मार्क तंत्रज्ञानाचा वापर: बोगद्यामध्ये तापमान ६०°C च्या वर गेल्यास स्प्रिंकलर सिस्टम सुरू होते.
१०० प्रकारच्या वन्यजीव रचना, 26 क्रॉस पॅसेज, आणि 572 सुरक्षा झोन.
गॅस पाईपलाईन, ३५ मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्प, १,००० शेततळी, आणि जलपुनर्भरण यंत्रणा.
🔧 समृद्धी महामार्गावर:
७६ किमीचा शेवटचा टप्पा ठाणे-नाशिक जिल्ह्यातून.
२५ इंटरचेंज, ३२ पूल, ६ किमी ओव्हरपास.
२२ सुविधा केंद्रे, आणि भविष्यात २०० मेगावॉट सौर प्रकल्प.
🚗 मुख्यमंत्र्यांचा स्वतःचा प्रवास:
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी या महामार्गावरून स्वतः वाहन चालवून पाहणी केली. शिंदेंनी वाहन चालवताना फडणवीसांना सोबत घेतले, तर पवार मागच्या सीटवर बसून प्रवासाचा आनंद घेत होते.
🔥 समृद्धी महामार्गावरील हायटेक बोगद्याची खासियत :तापमान 60 अंशांवर गेलं की सुरू होतात पाण्याचे फवारे! 🔧
महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आजपासून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला असून, इगतपुरी-आमणे दरम्यानच्या ७६ किमी लांबीच्या टप्प्यातील बोगदा विशेष आकर्षण ठरत आहे.या बोगद्यामध्ये प्रथमच डेन्मार्कमधून मागवलेली हायटेक अॅटोमॅटिक स्प्रिंकलर यंत्रणा बसवण्यात आली आहे.
एखाद्या वाहनाला आग लागल्यास आणि बोगद्यातील तापमान ६० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाले, तर ही यंत्रणा आपोआप सुरु होते आणि पाण्याचे फवारे सुरू होतात, ज्यामुळे आग आटोक्यात आणणे शक्य होते.
बोगद्यात २४ मीटर लांबीचे २८६ झोन असून एकूण ५७२ झोन तयार करण्यात आले आहेत. तसेच, १०० डबल अॅक्सल रिव्हर्सेबल व्हेंटिलेशन फॅन्स लावण्यात आले असून, धुराचे नियंत्रण व शुद्ध हवा यासाठी त्यांचा उपयोग होतो.
🚗 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महामार्गावर स्टेअरिंगवर!
समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सुमारे १८ किमी अंतराचा प्रत्यक्ष प्रवास केला.
गाडी चालवताना शिंदे यांच्या हाती जाताना स्टेअरिंग तर फडणवीस यांच्या हाती परतीच्या प्रवासात स्टेअरिंग होते. अजित पवार यांनी मात्र मागच्या सीटवर बसून प्रवासाचा आनंद घेत, स्टेअरिंगच्या स्पर्धेत आपण नाहीच हे दाखवून दिले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आम्हाला गाडी चालवण्याची सवय आहे. आम्ही एकमेकांच्या गाडीत देखील बसतो.”
🛣️ समृद्धी महामार्ग : स्मार्ट रोडचा उत्कृष्ट नमुना
▪️ शेवटच्या टप्प्यात ५ बोगदे, यातील एक ८ किमी लांबीचा देशातील सर्वात लांब बोगदा
▪️ बोगद्यात पॅसिव्ह फायर प्रोटेक्शन, रिफ्लेक्टिंग पॅनेल, २६ क्रॉस पॅसेजेस
▪️ २०० मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीची तयारी
▪️ २२ सुविधा केंद्रे, गेल कंपनीची गॅस पाइपलाइन, गडचिरोलीत स्टील उद्योगासाठी गॅसपुरवठा
📢 मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास
“हा महामार्ग केवळ नागपूर-मुंबई दरम्यानचा दुवा नाही, तर राज्याच्या विकासाचा मार्ग आहे. यामुळे नवे उद्योग, नवी शहरे, आणि हरित तंत्रज्ञानाला चालना मिळणार आहे.”