मुंबई : कलर्स मराठीवरील राजा राणीची गं जोडी या मालिकेने रसिकांच्या मनात घर केले आहे. रसिकांनी या मालिकेतील जोडी संजू आणि रणजितयांचे भरभरून कौतुक केले आहे.मालिकेच्या या रंजक भागात राजा रानीवर आलेले संकट त्या दोघांनी मिळून परतवून लावले आहे.त्यामुळे वाईटावर चांगल्याचा विजय होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मालिकेतील संजू आणि रणजीतची जोडी मोठमोठ्या संकटांना सामोरे जाऊन ते संकट दूर करतात.
रणजित कडून मिळालेल्या मार्गदर्शना संजू खऱ्या गुहेगारचा शोध लावू शकते आणि गुलाबने आखलेला डाव मोडीस काढते.त्यामुळे संजूच्या जिद्दीला आणि तिच्या प्रयत्नांना यश येऊन रणजितची निर्दोष सुटका होणार ! गुलाब रणजितला कठोर शिक्षा देण्याचा बेत आखात होती तो बेत आता संजूमुळे पूर्ण होऊ शकणार नाही.
मीडिया समोर आता संजू आणि रणजीचं कौतुक होणार आहे. रणजीतच्या सुटकेमुळे कुसुमावती नक्कीच खुश होतील, पण रणजीत – कुसुमावती मधील अबोला संजू कधी आणि कसा दूर करेल ? त्यानंतर गुलाब कोणते नवीन कारस्थान रचनार का ?अपर्णा – राजश्रीचे कारस्थान कधी घरच्यांच्या समोर येईल अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मालिकेमधून मिळणार आहे. आता संजू कशी त्या गुन्हेगारांपर्यंत पोहचणार ? कशी रणजीतची सुटका करणार ? कोणते अडथळे तिच्या मार्गात येणार ? त्याला ती कशी पार करणार हे कलर्स मराठी वरील राजा रानीची गं जोडी लोकप्रिय मालिकेमध्ये पुढे काय होणार हे २९ आणि ३० जुलै च्या विशेष भागात रसिकांना बघायला मिळणार आहे.