नाशिक (प्रतिनिधी ) – विज्ञान आणि साहित्य हे संस्कृतीचे दोन पंख आहेत.विज्ञानाने भौतिक विकास होतो तर साहित्यकलेमुळे आत्मिक उन्नयन होते. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासत साहित्यकलांतून मूल्यांची जपणूक करावी असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री मोहिनी भगरे यांनी केले.
लोकमान्य शिक्षणप्रसारक मंडळाने साहित्य संमेलनाध्यक्ष डाॅ.जयंत नारळीकर साहित्य दर्शन सप्ताहाचे आयोजन केले आहे.या अभिनव उपक्रमाचे उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी त्यांनी ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.जयंत नारळीकरांच्या साहित्याचा सुबोध परिचय करुन दिला.
नाशिक येथे आयोजित अखिल भारतीय साहित्यसंमेलनाच्या निमित्ताने लोकमान्य विद्यालयात संमेलनाध्यक्ष डाॅ.जयंत नारळीकर यांच्या साहित्य व कार्य कर्तृत्वाचा विद्यार्थ्यांना परिचय करुन देण्यासाठी या प्रकल्पाचे आयोजन केल्याचे मुख्याध्यापक श्री.महादेव घोडके यांनी सांगीतले.या प्रसंगी प्रसिद्ध अभिनेत्री सौ.मोहिनी भगरे यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले.प्रास्ताविक व परिचय श्री. राजेन्द्र बिऱ्हाडे यांनी केले.लीना पुराणिक यांनी डाॅ.जयंत नारळीकरांची एक कथा सांगितली. भीमा पालवे यांनी आभार मानले .सूत्रसंचालन गीता कौटकर यांनी केले.