सेंद्रीय नावाखाली रासायनिक भाजीपाला,फळांची विक्री ?

लेखक - हरिभाऊ सोनवणे ,सेंद्रीय, विषमुक्त शेती काळाची गरज ,भाग -३

0

केंद्र शासनाने नैसर्गिक शेती हे चागले अभियान हाती घेतले आहे. खरे तर ही मोठी  चलवळ व्हायला हवी. मात्र यात अट अशी आहे, प्रत्येक तालुक्यात किमान ५० हेक्कटर नैसर्गिक म्हणजेच सेंद्रीय शेती असायला हवी. शासनाच्या अशा चाचक अटी असल्यामुळे शेतकरी या अभियानाला कसा प्रतिसाद देणार? हीच संधी शेतकरयांना लुबाडणाऱ्या टोळ्या घेतात आणि, सेंद्रीय नावाखाली सर्रास रासायनिक भाजीपाला रसाळ फल विकी करतात.

दिवसेंदिवस रसानिक आणि जीवघेणे कीटकनाशक फवारून विविध आजार बळावत आहे. यावर पर्याय सेंद्रीय जैविक शेती हाच आहे.यातून सुरवातीला उत्पन्न कमी होणार यात शंका नाही.मात्र एकदा का खरेदीदारांची आपल्या सोन्यासारख्या मालाची खात्री झाली की, सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री करण्यासाठी फारसे कष्ट करावे लागत नाही. आपल्या मालाला आपल्याच परिसरामध्ये हमखास गिऱ्हाईक मिळाल्याशिवाय राहणार नाही परंतु आज परिस्थिती वेगळीच आहे.

सेंद्रिय भाजीपाला फळ यांच्या नावाखाली सर्रास रासायनिक पद्धतीने तयार केलेला शेती माळ विक्री करण्यात येत आहे हा अत्यंत मोठा धोका आहे. आपण स्वतःला फसवतो, विश्वासाने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची ही मोठ्या प्रमाणात फसवणूक होते यामध्ये विक्री करणाऱ्या टोळ्या सक्रीय असून शेतकऱ्यांच्या नावाखाली धंदा करीत आहे या सर्व परिस्थितीवर केंद्र शासनाने अत्यंत चांगले अभियान हाती घेतले आहे परंतु यामध्ये असलेली पन्नास हेक्टर ची अट अत्यंत जाचक असून या अटीमध्ये शेतकरी दूर गेल्याशिवाय राहणार नाही

खरे तर ज्या शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत नैसर्गिक सेंद्रिय शेती करण्याचा निर्धार केला आहे त्यांच्या पाठीमागे शासनाच्या विविध योजना भक्कमपणे उभा राहिल्या तरच आपल्या भावी पिढीचे आरोग्य सदृढ होण्याच्या दृष्टीने मार्ग निघू शकेल अन्यथा शासनाच्या विविध योजना या कागदपत्रीच राहणार असून त्यातून काही निष्पन्न होणार नाही. यात पुढारी शेतकरी हेच या योजनांचा मलिदा लाटून जातील यात शंका नाही (क्रमशः)
हरिभाऊ सोनवणे
(पत्रकार तथा प्रयोगशील शेतकरी-९४२२७६९४९१)

Haribhau Sonavane Nashik
हरिभाऊ सोनवणे (पत्रकार तथा प्रयोगशील शेतकरी-९४२२७६९४९१)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.