शनिशास्त्र : मीन राशीच्या व्यक्तींनो सावधान

हरिअनंत,नाशिक

0

हरिअनंत,नाशिक

पुढच्या वर्षी २९ एप्रिल २०२२ शुक्रवारी शनी परिवर्तन होत आहे. शनि कुंभ राशीत प्रवेश करताच, धनू राशीची साडेसाती समाप्त होते आणि मीन राशीच्या साडेसातीचा प्रथम चरण आरंभ होतोय १२ जुलै २०२२ मंगळवारी शनी वक्री होऊन पूर्वत मकर राशीत प्रवेश करताच मीन राशीची ही साडेतीन महिन्याची साडेसाती समाप्त होते १६ जानेवारी २०२३ पर्यन्त या साडेसातीपासून काही काळा पर्यंत सुटका होणार आहे.

परंतु  १७ जानेवारी २०२३ मंगळवारी  शनि कुंभ राशीत प्रवेश करताच मीन राशीची साडेसातीचा आरंभ होणार आहे. मीन राशीच्या व्यक्तींनी अतिशय सतर्क होऊन प्रत्येक काम योग्य निर्णय घेऊन करायचे आहे सर्वप्रथम आपण शनीची साडेसाती समजून घेतली पाहिजे आणि जे शनीच्या साडेसातीला समजून घेतात ते न घाबरता शनीच्या साडेसातीला सामोरे जातात. प्रथमतःआपण समजून घेऊया. शनीची साडेसाती सुरू होतेय, हे ऐकून घाबरून जाऊ नये.शनीची साडेसाती आरंभ होण्यापूर्वी १७ महिने आधी शनि आपल्याला सावध करीत असतो.

शनीची साडेसाती म्हणजे आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्माची तपासणी ज्या राशीला साडेसाती सुरू झालीय त्या राशीच्या व्यक्तीचे कर्म उत्तम असतील, तर त्या व्यक्तीला साडेसातीचा मुळीच त्रास होत नाही. मात्र त्या व्यक्तीने काही चुकीचे कर्म केले असतील चुकीचे अर्थात तुम्ही चुकीचे म्हणजे काय ? हे समजू शकता.!

शनीच्या साडेसातीत आपण केलेली कोणतीच चूक लपून राहत नाही. याचं महत्वपूर्ण कारण म्हणजे शनी हा कर्माचा न्यायाधीश आहे. शनी व्यक्तीच्या मनाच्या तळाशी दडलेलं सत्य शोधून काढतो.शनीच्या साडेसातीत होणाऱ्या त्रासाला एकमेव शनि जबाबदार नसतो. साडेसातीत पूर्व जन्मीच्या कर्माची ही शनी तपासणी करतो; पूर्व जन्मीचे कर्म चांगले असतील, तर साडेसातीत शनी भरभराट करतो.कर्म वाईट असतील तर असलेल्या भरभराटीला शनी  समाप्तही करतो.

ज्या राशीला साडेसाती सुरू झाली त्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत शनि उत्तम स्थितीत असेल तर मुळीच घाबरायचे नाही. मात्र शनी पत्रिकेत उत्तम असूनही त्या शनीला चुकीचे कर्म करून खराब केले असेल, तर मिळणाऱ्या शिक्षेपासून सुटकेसाठी  निश्चित प्रयत्न करण्यासाठी कृपाळू शनीने योग्य मार्गदेखील तयार केलेला आहे.आपण त्या योग्य मार्गापर्यंत पोहचण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे.

साडेसातीचा प्रथम चरणात मीन राशीच्या व्यक्तीने कर्ज,पैशाची देवाण घेवाण अतिशय विचारपूर्वक केली पाहिजे.छोटासा,आजार, व्याधी याकडे दुर्लक्ष न करता त्यावर त्वरित इलाज केला पाहिजे.

मीन राशीचा स्वामी गुरू आहे, गुरूच्या कृपेनं मीन राशीला गुरू योग्य मार्ग दाखवतात पण मीन राशीच्या जन्मपत्रिकेत गुरू बिघडलेला असेल, चुकीचे कामें करून गुरू बिघडवलेला असेल तर साडेसातीत खूप त्रास होतो

शनि न्यायाविषयी कुणाच्या ही शिफारसीला दाद देत नाही.जन्मपत्रिकेला जे महत्व आहे ते केवळ शनिमुळे.ह्या निर्भीड सत्याकडे कदापि दुर्लक्ष करून चालणार नाही.

त्याचप्रमाणे गुरुची योग्यप्रकारे सेवा करणे, गुरू बिघडणार नाही याची योग्य काळजी घेणे मीन राशीचेच नव्हे तर प्रत्येक राशीच्या व्यक्तीचे कर्तव्य आहे.

बिघडलेल्या गुरूचा परिणाम बघा

जन्मलग्नी कर्क चा गुरू होता म्हणून प्रभू रामाला वनवासात जावे लागले.तृतीयात गुरूने बळीला पाताळात पाठवले. षष्ठात गुरू होता म्हणून द्रौपदीचे वस्त्रहरण झाले.अष्टमात गुरू म्हणून बलाढ्य रावणाचा नाश झाला.

द्वादशात मकरेचा गुरू होता म्हणून भीष्माचार्याचा राज्यभिषेक झाला नाही. पंचमस्थानी गुरू म्हणून म्हणून राजा दशरथाला प्राण सोडावे लागले.एकादश स्थानात कर्कचा गुरू म्हणून नळराजाला वनवास भोगावा लागला.ही गुरुच्या स्थानाची ठळक उदाहरणे आपल्या पुराणात लिहिली आहेत. साडेसाती सुरु होण्या पूर्वी सावधान होणे अतिशय महत्वाचे आहे. (क्रमशः) भाग -१४४

शुभम भवतु …

मीन राशीच्या साडेसाती विषयी.. काळजी, स्वभाव   सावधानता, आजार, व्यवसाय,  आणि त्यावरील उपाय.काही अडचण, शनि विषयी काही शंका, पत्रिका व्यवस्थित असून अडचणी सुटत नसेल, तर ‘विनामूल्य मार्गदर्शन ‘ सकाळी ११ ते १ पर्यन्त तुम्ही मला 9096587586 या नंबर वर कॉल करू शकता,…हरीअनंत 

 

Hari Ananat -Shani Shastra
   हरिअनंत,नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.