हरिअनंत,नाशिक
आपण मीन राशीला लागणाऱ्या साडेसाती विषयी चर्चा करीत आहोत, म्हणजेच साडेसातीत शनीची एकंदरीत भूमिका ! शनीच्या भूमिकेला केवळ मीन राशींच्या व्यक्तींनी नव्हे तर प्रत्येक राशींच्या व्यक्तींनी समजून घेणे महत्वाचे आहे.याचे महत्वपूर्ण कारण म्हणजे जन्मपत्रिकेत सर्वात महत्वाची भूमिका ही शनीची असते आणि आहे. साडेसाती आरंभ होताच शनी व्यक्तीच्या डोक्यावर विराजमान होतो.अर्थात व्यक्तीचे कर्म चांगले असतील तर घाबरण्याचे कारण नाही, पण कर्म चुकीचे असतील तर निश्चितच चिंता करण्याची गरज नसते.
साडेसातीत अनेकांना अनेक प्रकारचा त्रास भोगावा लागतो. कित्येकांस सांपत्तिकअडचणी व द्रव्यनाश,तर कित्येकांस उद्योगधंद्यात नुकसान. शनी एका क्षणात होत्याचं नव्हतं करतो, काही लोकांना कारागृहवास भोगावा लागतो. तर रोगाने पछाडलेले व जीवाला कंटाळलेले आणि परमेश्वराची नित्यश: प्रार्थना करणारे हतभागी प्राणी ही काही आहेत. साडेसाती थोडी तरी भोवली नाही असा प्राणी विरळा. शनीच्या प्रत्येक स्थानाचे फल सांगितले पाहिजे. त्याचे कारण असे आहे की,नुसत्या साडेसातीतच शनीचा त्रास भोगावा लागतो असे नव्हे, तर शनी ज्या ज्या वेळी अनिष्ट येतो, त्या- त्या वेळी त्याचे फल हे दंडात्मकच मिळते यासाठी आपण शनी विषयी नेहमीच सतर्क रहायला हवं.
कोणन्त को रौद्रयमो थ बभृ:
कृष्ण: शनि: गलमदंसौरि।।
शनीच्या या दहा नावांचे स्मरण केले असता शनीच्या होणाऱ्या पीडाचा त्रास कमी होतो. शनीची पीडा दूर करण्यासाठी शनीची पूजा करावी.. शनिवारी एकभुक्त व्हावे व शनीच्या कृपेसाठी उडीद,तीळाचे तेल, वस्त्र, लोखंड या वस्तूंचे दान करावे. अर्थात आपल्याला शनीचा काय त्रास होतोय यावर उपाय अवलंबून आहे..शनीच्या मंत्राची जपसंख्या ही तेवीस हजार असावी.
जन्मराशीपासुन शनि पहिला येईल, तर शरीरास आजार उत्पन्न होऊन मस्तकास पीडा होते. शारीरिक दुर्धर प्रसंग ओढवतात. स्थलांतर व प्रवासाचे कामात अतिशय कष्ट होतात. स्त्रीला पीडा व (क्रमशः) भाग -१५१
शुभम भवतु …
मीन राशीच्या साडेसाती विषयी.. काळजी, स्वभाव सावधानता, आजार, व्यवसाय, आणि त्यावरील उपाय.काही अडचण, शनि विषयी काही शंका, पत्रिका व्यवस्थित असून अडचणी सुटत नसेल, तर ‘विनामूल्य मार्गदर्शन ‘ सकाळी ११ ते १ पर्यन्त तुम्ही मला 9096587586 या नंबर वर कॉल करू शकता,…हरीअनंत