Sharad Pawar NCP Candidate List:राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

बारामतीमध्ये अजित पवार वि.युगेंद्र पवार यांच्यात महामुकाबला

0

मुंबई,दि,२५ ऑक्टोबर २०२४ – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने(Sharad Pawar NCP Candidate List) विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. दरम्यान ही पहिली यादी असून दुसरी यादी पुढील दोन दिवसांमध्ये दुसरी जाहीर होणार आहे. पहिल्या यादी मध्ये बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे आता बारामतीत काका विरुद्ध पुतण्या असा महामुकाबला होणार आहे. तर मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीचे युवा नेते महेबुब शेख यांना बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. उरलेल्या मतदारांची यादी मुंबईत जाऊन जाहीर केली जाईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. काही जागांवर अद्यापही चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांची नावे मुंबईतच जाहीर केले जाईल, असेही ते म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढे म्हणाले की, तीनही पक्षांनी प्रत्येकी ८५ जागांवर एकमत केले आहे. उरलेल्या जागांवर मित्रपक्षांशी चर्चा करून त्याही जागा लवकरच जाहीर केल्या जातील. तीनही पक्ष २७५ जागा लढविणार असून उरलेल्या जागा मित्रपक्षांना देण्यात येतील. तसेच मुंबईतील अणुशक्ती नगर हा नवाब मलिकांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची, हा निर्णयही लवकरच घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची पहिली यादी

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!