शरद पवारांच्या गटाला नवीन नाव मिळाले

0

नवी दिल्ली ,दि. ७ फेब्रुवारी २०२४ –अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर आता शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar) हे नाव मिळालं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नाव देण्यात आलं असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पवार गटाला आता या नवीन नावावर निवडणूक लढवता येणार आहे. पक्षाच्या चिन्हावर मात्र अद्याप काही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडे गेल्यानंतर शरद पवार गटाला नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाला काही पर्याय द्यायचे होते. त्यामध्ये शरद पवार गटाने नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार , नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार ही तीन नावं दिली होती. त्यामध्ये निवडणूक आयोगाने ‘नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ म्हणजे ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव त्यांना दिलं आहे.

नव्या चिन्हासाठी शरद पवार गट हा वटवृक्ष या चिन्हासाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. त्याबद्दलचा निर्णय लवकरच लागण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात राज्यसभेच्या निवडणुका असून त्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला नवीन नाव देण्यात आलं आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.