नवी दिल्ली,दि,०९ नोव्हेंबर २०२४ – Skoda ने अद्याप भारतात आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च केलेली नाही. स्कोडा ऑटो इंडियाने प्रथम ही कार भारत ग्लोबल मोबिलिटी एक्सपोमध्ये दाखवली होती, त्यानंतर ती या वर्षी फेब्रुवारीमध्ये लॉन्च होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कंपनीने ईव्हीचे लाँचिंग पुढे ढकलले होते. आता, एका ताज्या अहवालातून असे समोर आले आहे की स्कोडा भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार पुढील वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये लॉन्च करण्याची योजना आखत आहे.कंपनीच्या एका अधिकाऱ्यानेही या विलंबाचे कारण स्पष्ट केले आहे. Skoda ने २०२२ मध्ये पाच ट्रिम्ससह Enyaq EV जागतिक बाजारात लॉन्च केले. कारची कमाल रेंज ५५० किलोमीटर असल्याचे सांगितले जाते. तथापि, कंपनी काही मोठ्या अपडेटसह ही EV भारतात लॉन्च करण्याचा विचार करत आहे.
Skoda चे युरोपियन बेस्टसेलर, Enyaq EV चे लॉन्च पुढील वर्षासाठी पुढे ढकलण्यात आले आहे, स्कोडा इंडिया ऑटो ब्रँडचे संचालक पेटर जानबा यांनी ANI (बिझनेस इनसाइडर मार्गे) वृत्तसंस्थेला सांगितले. अपडेटेड व्हर्जनचा विकास हे त्यामागचे कारण सांगितले जात आहे. जेनेबा सांगतात की, मॉडेलच्या फेसलिफ्टची योजना मार्चमध्ये करण्यात आली होती. स्कोडाच्या नवीनतम डिझाइन शैलीसह ही नवीन कार तयार होईपर्यंत कंपनीने लॉन्च स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला.
एवढेच नाही तर जेनेबाने असेही सांगितले की, स्कोडा तिच्या सध्याच्या तीनपैकी कोणतेही एक किंवा सर्व तीन मॉडेल भारतात लॉन्च करण्याचा विचार करत आहे. सध्या कंपनीच्या पोर्टफोलिओ मध्ये Skoda Elroq, Skoda Enyaq आणि Skoda Enyaq Coupe मॉडेल्सचा समावेश आहे.
सध्या कंपनी भारताच्या बदलत्या ईव्ही पॉलिसीवर बारीक लक्ष ठेवून आहे. स्कोडाची भारतात छत्रपती संभाजी नगर आणि पुणे येथे आधीच दोन उत्पादन युनिट आहेत. त्यांच्या पुण्यातील प्लांटमध्ये ईव्हीचे उत्पादन करण्याची योजना आहे.
Skoda Enyaq इलेक्ट्रिक SUV 2022 मध्ये जागतिक बाजारपेठेत सादर करण्यात आली. इलेक्ट्रिक कार ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्ट सिस्टम (ADAS), 360-डिग्री कॅमेरा, ड्युअल ऑल-डिजिटल डिस्प्ले आणि मल्टीफंक्शन स्टीयरिंग व्हीलने सुसज्ज आहे. जागतिक बाजारपेठेत,Enyaq पाच ट्रिम्समध्ये सादर केले गेले आहे, ज्यापैकी बेस मॉडेल 400 किलोमीटरपर्यंतची रेंज असल्याचा दावा करते आणि टॉप मॉडेल 550 किलोमीटरपर्यंत रेंज असल्याचा दावा करते.