नांदगाव तालुक्यात रुग्णांसाठी अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणार

अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांची ग्वाही

0

नांदगाव, दि. ८ नोव्हेंबर २०२४ –नांदगाव तालुक्यात रुग्णांसाठी सुसज्ज रुग्णालय नसल्याने रुग्णांची मोठी हेळसांड होते. त्यामुळेच या तालुक्यात सर्व सुविधांनी युक्त सुपर स्पेशालिटी रुग्णालय करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांनी साकोरा येथील सभेला संबोधित करताना व्यक्त केला. साकोरा येथील सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होती. सुरुवातीला गावातून सवाद्य मिरवणूक काढत फटाक्यांची आतषबादीत समीर भुजबळांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी समीर भुजबळ म्हणाले की, नांदगाव तालुका हा दुष्काळी तालुका आहे. साकोरा हे गाव लोकसंख्येने मोठे आहे. मांजरपाड्याचे पाणी शाकंबरी नदीत टाकून ते साकोरा व पुढे मन्याडकडे जाते. तर झाडी एरंडगाव मार्गे नाग्या साग्या धरणात व तेथून साकोऱ्यापर्यंत येते. दोन्ही बाजूने या गावाला सिंचनाची सोय उपलब्ध होऊ शकते. गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे आपोआपच निकाली निघणार आहे. नांदगाव तालुक्यात रुग्णांकरता चांगले रुग्णालय नाही. त्यामुळे या तालुक्यात सर्व सुविधांनी युक्त असे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा संकल्प या निमित्ताने करीत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पुढे ते म्हणाले की, साकोरा येथे येवल्याच्या धरतीवर शिवसृष्टी, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व चौक सुशोभिकरण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी मतदान यंत्रावरील नऊ क्रमांकासमोरील शिट्टी या निशाणीवर आपले बहुमोल मत द्यावे आणि मला विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला व्यासपीठावर मविप्र संचालक अमित बोरसे पाटील, भयमुक्त नांदगाव प्रगतशील नांदगाव समन्वय समितीचे अध्यक्ष विजय पाटील, देवदत्त सोनवणे, भगवान सोनवणे, शेखर पगार, पी आर निळे, ज्ञानेश्वर सुरसे, राजू बोरसे, अशोक मंडलिक, अशोक पाटील, प्रल्हाद मंडलिक, सुरसे सर, रवी सुरसे, बापू पाटील, योगेश पाटील, संजय सुरसे, रमेश अण्णा बोरसे, संजय भालेराव, भगवान भोसले, दिलीप नरोडे, अमोल बेंडके, दीपक धीवर, राजाभाऊ गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सुरुवातीला समीर भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.