महावितरणकडून स्मार्ट टीओडी मीटर-घरगुती ग्राहकांना दिवसा मिळणार स्वस्त वीज

मीटरचे होणार स्वयंचलित रीडिंग; विजेचा वापरही मोबाईलवर उपलब्ध

0

नाशिक, दि. १२ ऑगस्ट २०२५ Smart TOD meter Maharashtra राज्यातील घरगुती वीजग्राहकांसाठी महावितरणने स्मार्ट टाईम ऑफ डे (T.O.D.) मीटर योजनेचा शुभारंभ केला आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे सकाळीते सायंकाळीवाजेपर्यंतच्या वीज वापरावर प्रतियुनिट ८० पैसे तेरुपया सवलत मिळणार असून, ही सुविधाजुलै २०२५ पासून सुरू झाली आहे.

स्वस्त वीजदरांचा थेट फायदा(Smart TOD meter Maharashtra)

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने २०२५ ते २०३० या कालावधीसाठी घरगुती ग्राहकांना दिवसा वीजदरात सवलत देण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार

२०२५-२६: प्रतियुनिट ८० पैसे सवलत

२०२७: प्रतियुनिट ८५ पैसे सवलत

२०२८-२९: प्रतियुनिट ९० पैसे सवलत

२०३०: प्रतियुनिटरुपया सवलत

मीटरचे विशेष फायदे

स्वयंचलित मासिक रीडिंग मानवी हस्तक्षेपाची गरज नाही, त्यामुळे बिलिंग तक्रारी कमी होतील.

विजेचा वापर मोबाईलवर पाहता येणार दर अर्ध्या तासाला वापराची माहिती मिळेल.

ऊर्जेचे नियोजन वापर नियंत्रित करून खर्चात बचत शक्य.

सौर प्रकल्पांचा हिशोब छतावरील सौरऊर्जेच्या वापरशिल्लक विजेची माहिती तत्काळ उपलब्ध.

मोफत बसवणी, पोस्टपेड पद्धत कायम

महावितरण हे स्मार्ट टीओडी मीटर पूर्णपणे मोफत बसवत असून, ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार येणार नाही. हे मीटर प्रीपेड नसून पोस्टपेड असल्याने वीज वापरल्यानंतर मासिक बिल भरण्याची सध्याची पद्धतच कायम राहणार आहे.

या उपक्रमामुळे घरगुती ग्राहकांना केवळ आर्थिक दिलासा मिळणार नाही, तर विजेच्या वापरावर नियंत्रण ठेवून ऊर्जेची बचतही साधता येणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!