ST महामंडळाची ऐतिहासिक योजना! खाजगी टूर्स कंपन्यांच्या सहकार्याने पर्यटनाच्या नव्या पर्वाची सुरुवात
🚌 एसटी महामंडळ आणि खाजगी टुरिस्ट कंपन्यांच्या सहकार्याने भाविकांसाठी आता प्रवास होणार परवडणारा आणि सुलभ!
मुंबई,दिनांक – १६ जून २०२५- STBus Religious Tour Scheme सर्वसामान्य नागरिकांना धार्मिक पर्यटनाचा लाभ सहज आणि स्वस्तात घेता यावा, यासाठी राज्य परिवहन विभागाने आजवरची सर्वात प्रभावी योजना साकार केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून एसटी महामंडळ आणि खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने धार्मिक सहलींचे आयोजन करण्यात येणार आहे.
📌 या योजनेची वैशिष्ट्ये: (STBus Religious Tour Scheme )
अत्यंत कमी खर्चात अष्टविनायक, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, त्र्यंबकेश्वर, ज्योतिर्लिंग अशी धार्मिक स्थळे दाखवली जातील.
निवास आणि भोजन व्यवस्था सुलभ व किफायतशीर दरात उपलब्ध करून दिली जाणार.
कमी गर्दीच्या हंगामात सहलींचे आयोजन – ज्यामुळे एसटीचा महसूलही वाढणार!
पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्री निःशुल्क स्वच्छतागृह व निवास सुविधा देण्याचा प्रयत्न.
🗺️ राज्यभर राबवली जाणार योजना –5 प्रादेशिक विभागांची निर्मिती
योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती आणि नागपूर या 5 प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली आहे. कर्नाटक परिवहन महामंडळाच्या धर्तीवर या विभागांचे नियोजन, समन्वय आणि नियंत्रण ठेवले जाणार आहे.
🗣️ मंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन:
“एसटीचे उत्पन्न वाढवणे आणि गोर-गरीब जनतेला धार्मिक पर्यटनाचा लाभ मिळवून देणे हेच या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. खाजगी कंपन्यांनी पुढे येऊन यामध्ये सहभाग घ्यावा, ही विनंती आहे.”
🌿 उपक्रमास सुरुवात श्रावण महिन्यापासून
परिवहन मंत्र्यांनी एसटी प्रशासनाला निर्देश दिले आहेत की, श्रावण महिन्यापासून या उपक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात यावी.