मुंबई – स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१ या गणपती विशेष कार्यक्रमाची सध्या कमालीची उत्सुकता आहे. प्रवाह कुटुंबाने एकत्र येऊन यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात साजरा केलाय. त्यामुळे गणेशोत्सवाची रंगत द्विगुणीत होणार यात शंका नाही. ढोल-ताश्यांच्या गजरात बाप्पाचं स्वागत करण्यापासून ते अगदी आरती, गणेशजन्माची कथा, बाप्पाची गाणी असं सगळं अगदी जल्लोषात पार पडणार आहे. विशेष म्हणजे आनंद आणि आदर्श शिंदे आणि अजय अतुल यांच्या स्वरमधुर आवाजाने या कार्यक्रमाची रंगत आणखी वाढणार आहे. बाप्पाची लोकप्रिय गाण्यांचा आस्वाद या कार्यक्रमातून प्रेक्षकांना घेता येईल.