राज्य नाट्य स्पर्धेत विनोद राठोड यांची हॅट्रिक

0

नाशिक,दि,१३ ऑक्टोबर २०२४-महाराष्ट्र शासन सांस्कृतिक संचानलाय आयोजित राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच मुंबई येथील सावरकर स्मारक नाट्यगृहात पार पडला.नाशिक येथील सुप्रसिद्ध प्रकाश योजनाकार विनोद राठोड यांना हिंदी राज्य नाटय स्पर्धे करिता भगवान हिरे लिखित व राम दौंड दिग्दर्शित बदलते करवटे ह्या हिंदी नाटकाकरिता प्रकाशयोजनेच्या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थित पार पडलेल्या या समारंभात जेष्ठ प्रकाश योजनाकार शीतल तळपदे व नाटय निर्माता संघाचे अध्यक्ष संतोष काणेकर ह्यांचा हस्ते विनोद राठोड यांना गौरविण्यात आले.

या वर्षीच्या मराठी राज्य नाटय स्पर्धेत नाशिक केंद्रात चोरीला गेलाय या नाटक करता,मुंबई केंद्रात आर्याम नाटकाकरिता तसेच अंतिम हिंदी राज्य नाट्य स्पर्धेत बदलती करवटे या तिन्हीही नाटकाकरता विनोद राठोड यांनी या वर्षी प्रकाश योजनेचे पारितोषिक मिळवून एक वेगळीच हॅट्रिक केली आहे.त्यांचे ह्या विजयाने सांस्कृतिक सह सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.