स्वानंद बेदरकर यांच्या कवितासंग्रहाचे रविवारी १५ जूनला प्रकाशन
अभिनेते मकरंद देशपांडे यांच्या हस्ते प्रकाशन;रणधीर शिंदे व मिलिंद जोशी यांची उपस्थिती
नाशिक, दि. १३ जून २०२५ –Swanand Bedarkar poetry book सुप्रसिद्ध व्याख्याते, संपादक आणि साहित्यिक स्वानंद बेदरकर यांच्या पहिल्यावहिल्या कवितासंग्रह “पावसाच्या गर्भतळी” चे प्रकाशन रविवार, १५ जून २०२५ रोजी पुण्यात होणार आहे.
हा सोहळा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे. या विशेष कार्यक्रमात नाट्य, चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते व नाटककार मकरंद देशपांडे हे उपस्थित राहून संग्रहाचे प्रकाशन करतील. ज्येष्ठ समीक्षक रणधीर शिंदे हे पुस्तकावर सखोल भाष्य करतील. तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
स्वानंद बेदरकर (Swanand Bedarkar poetry book) यांनी आजवर संपादन, व्याख्याने, साहित्यसंवाद अशा विविध माध्यमांतून मराठी साहित्यविश्वात भरीव योगदान दिले आहे. “पावसाच्या गर्भतळी” हा त्यांचा पहिला स्वतंत्र कवितासंग्रह असून पावसाच्या विविध भाव-छटा, मानवी भावभावना आणि सामाजिक-सांस्कृतिक गुंफण या संग्रहात कवितांद्वारे व्यक्त झाली आहे.
या संग्रहाची प्रस्तावना रणधीर शिंदे यांनी लिहिली असून त्यात ‘पावसावर मानवी आरोपण’ या संकल्पनेचा ललित आणि अर्थपूर्ण अन्वय वाचायला मिळतो. कौटुंबिक, वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवरील नातेसंबंधांचे प्रतिबिंब या कविता टिपतात.
[…] मांडणी नसून ती जगण्याची अनुभूती असते. स्वानंद बेदरकर यांच्या ‘पावसाच्या गर्भतळी’ या […]