शारदीय नवरात्री सुरू होऊन ३ दिवस पुर्ण झाले आहे.अनेक ठिकाणी देवीचे आगमन झाले असून नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते.महिलावर्ग नऊ दिवसाचे उपवास करतात. साबुदाण्याचे पदार्थ खाऊन अनेकांना कंटाळा येतो.त्यामुळे नवरात्री उत्सवात उपवास केल्यानंतर उपवासाच्या दिवशी नेमकं काय खावं हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही रताळ आणि बटाट्यापासून बनवलेल्या पदार्थाचे सेवन करू शकता. रताळ आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. रताळ्याचे सेवन केल्यामुळे शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यामध्ये रताळ्याचे चाट कसे बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे चाट बनवण्यासाठी अगदी सोपे असून कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते. चला तर जाणून घेऊया रेसिपी
नवरात्रीत सकाळी नाश्त्यात स्वादिष्ट आणि आरोग्यदायी रताळे चाट बनवू शकता. रताळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच रताळे चाट कमी वेळेत तयार होते.
साहित्य:
उकडलेले रताळे
पाणी
आमचुर पावडर
जिरे पावडर
सैंधव मीठ
लिंबाचा रस
रताळे चाट बनवण्याची कृती
सर्वात पहिले रताळे धुऊन स्वच्छ करावे. नंतर पॅनमध्ये वाफवून घ्यावे. नंतर एका प्लेटमध्ये थंड करायला काढून ठेवावे.रताळे आधी रताळे सोलून नंतर वाफवून घेऊ शकता.रताळे चांगले शिजल्यानंतर हलके सोलून घ्या आणि लहान चौकोनी तुकडे करा.त्यांना एका भांड्यात घ्या.नंतर काळी मिरी पावडर,आमचुर पावडर आणि सैंधव मीठ घालावे.बारिक जीरं पावडर देखील टाकू शकता.नंतर लिंबाचा रस मिक्स करा आणि सर्व्ह करावा.हा पदार्थ तुम्ही उपवासा व्यतिरिक्त इतर दिवशी सुद्धा खाऊ शकता.
आजचा रंग – राखाडी
आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा