मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर

0

नाशिक,दि, ५ ऑक्टोबर २०२४ –विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष आज पासून(दि,५) दोन दिवस नाशिक दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्या नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे.या दौऱ्यात ते उत्तर महाराष्ट्रातील ४७ मतदारसंघांचा आढावा घेणार असून, उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे. विशेषतः नाशिकचा गड पुन्हा काबीज करण्यासाठी राज ठाकरेंच्या या दौऱ्यात व्यूव्हरचना आखली जाणार असल्याने हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे

राज्यातील सर्वच २८८ जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. त्यासाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला ५ व ६ ऑक्टोबर रोजी ते नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते उत्तर महाराष्ट्रातील ४७ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत.राज ठाकरे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात प्रचार केला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. राज ठाकरे यांच्या बदललेल्या राजकीय भूमिकेमुळे त्यांच्यावर जोरदार टीकाही झाली होती. विधानसभा निवडणुकीत मनसे महायुतीत सामील होणार का, असा सवाल उपस्थित केला जात असताना राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याची घोषणा केली.

राज ठाकरेंचे आज नाशिक मध्ये आगमन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज दुपारी ३ वाजता ओझर विमानतळावर आगमन होणार असून त्यानंतर ते वणीच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणार असून सायंकाळी ७ वाजता त्यांचे नाशिक शहरात आगमन होणार आहे. उद्या सकाळी ९ ते ५ या वेळात उत्तर महाराष्ट्रातील सर्व विधानसभा पदाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते पुण्याकडे रवाना होतील.

नाशिकचा गड मिळविण्याची धडपड
कधी काळी नाशिक हा मनसेचा गड समजला जात होता. मनसेची स्थापना झाल्यानंतर राज ठाकरेंना सर्वाधिक पाठिंबा नाशिकमधूनच मिळाला. नाशिकमधील तीनही विधानसभा मतदारसंघांवर मनसेचे आमदार निवडून आले होते. इतकेच नव्हे तर, नाशिक महापालिकेची सत्त देखील मनसेच्या हाती आली होती. पक्षफुटीनंतर मनसेच्या गडाचे एक-एक बुरूज ढासळत गेले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ठाकरे यांनी नाशिककडे लक्ष केंद्रित केले आहे.

नाशिक विधान सभा मतदार संघात महिला उमेदवारांना संधी मिळणार ?
नाशिक शहरातील तीन मतदार संघापैकी एका मतदार संघात महिला उमेदवाराला संधी देण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. नाशिक मध्य मतदार संघातून महिला उमेदवाराला संधी मिळेल अशी चर्चा आहे. २०१९ च्या निवडणुकीत नाशिक मध्य नाशिक मधून भाजपाच्या देवयानी फरांदे विजयी झाल्या तर दुसऱ्या नंबरला काँग्रेसच्या हेमलता पाटील या होत्या महायुती आणि महाआघाडी कडून महिला उमेदवार दिल्यास मनसे तर्फे महिला उमेदवार देण्याची तयारी झाली असून लवकरच या बाबत निर्णय होणार आहे.

Dhanashree Adhe (Singer)
धनश्री आढे (गायिका)

आजचा रंग – राखाडी
आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.