रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये दहशतवादी हल्ला : ७० जणांचा मृत्यू ;१७० जखमी 

आयएसआयएस ने दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

0

मॉस्को,दि,२३ मार्च २०२४- रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये एका मोठ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला(Terrorist Attack in Moscow) झाला असून त्यामध्ये ७० जणांचा मृत्यू झाला आहे तर १७० जण जखमी झाल्याची माहिती आहे.शुक्रवारी,२२ मार्च रोजी संध्याकाळी,काही अज्ञात हल्लेखोरांनी रशियाच्या मॉस्को प्रांतातील क्रॅस्नोगोर्स्क येथील क्रोकस सिटी हॉलमध्ये गोळीबार आणि स्फोट घडवून आणला.मॉस्कोमध्ये झालेल्या या भीषण हल्ल्याची जबाबदारी आयएसआयएस या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे.

रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन हे पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर हा मोठा हल्ला घडला आहे.सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये इमारतीच्या वरती काळ्या धुराचे मोठे लोट उठताना दिसत आहेत. क्रोकस सिटी हॉलमध्ये प्रसिद्ध रशियन रॉक बँड पिकनिकच्या मैफिलीत सहभागी होण्यासाठी लोकांची गर्दी जमली असताना हा हल्ला झाला.त्यासाठी जवळपास ६ हजार नागरीक उपस्थित होते अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे

मॉस्कोमध्ये शुक्रवारी रात्री एक म्युझिक कॉन्सर्ट सुरू असतांना अचानक सहा ते सात हल्लेखोर लष्कराच्या ड्रेस मध्ये बुलेटप्रूफ जाकीट घालून हॉल मध्ये शिरले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. बंदिस्त ठिकाण असल्यामुळे अनेक जण जागेवरच मृत्युमुखी पडले, कारण तिथून पळण्यासाठी कुठलाही मार्ग नव्हता.१५ ते २० मिनिटं हे हल्लेखोर गोळीबार करत होते.त्यानंतर त्यांनी या कॉन्सर्ट हॉलला आग लावली, ज्यामध्ये ४० टक्के भाग जळून खाक झाला.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून जखमींमध्ये ६० ते ७० लोकांची प्रकृती चिंताजनक आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.